S M L

H1N1ने दगावणारे पेशंट पुण्याबाहेरचे

30 एप्रिलपुण्यात एप्रिल महिन्यापासून H1N1 मुळे मृत्यू झालेल्यांपैकी 51 टक्के पेशंट हे पुण्याबाहेरचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग तसेच अहमदनगर, सातारा, नाशिक जिल्ह्यांतील पेशंटचा यात समावेश आहे. आत्तापर्यंत या सीझनमध्ये मृृत्यू झालेल्या 33 पेशंट्सपैकी 14 पुणे शहरातील तर 12 पुणे ग्रामीण भागातील असून उरलेल्यांमधे अहमदनगर, सातारा येथील प्रत्येकी 2 तर नाशिक येथील एक पेशंट आहे. याशिवाय सोलापूर आणि मुंबई येथील प्रत्येकी एक पेशंट पुण्यात येऊन दगावला आहे. यावेळी टॅमी फ्लूसोबत 2 व्हॅक्सिन्स उपचारासाठी उपलब्ध असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.हायपरटेन्शन,डायबेटीस, एचआयव्हीबाधित, गर्भवती स्त्रिया अशा लोकांना H1N1 ची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. स्वयंसेवी संस्था तसेच राजकीय पक्षांतर्फे सिरम इन्स्टिट्यूटतर्फे विकसित केलेल्या नाकावाटे घ्यावयाच्या लसी मोफत देण्याचे उपक्रमही सुरू झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2010 04:31 PM IST

H1N1ने दगावणारे पेशंट पुण्याबाहेरचे

30 एप्रिल

पुण्यात एप्रिल महिन्यापासून H1N1 मुळे मृत्यू झालेल्यांपैकी 51 टक्के पेशंट हे पुण्याबाहेरचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग तसेच अहमदनगर, सातारा, नाशिक जिल्ह्यांतील पेशंटचा यात समावेश आहे.

आत्तापर्यंत या सीझनमध्ये मृृत्यू झालेल्या 33 पेशंट्सपैकी 14 पुणे शहरातील तर 12 पुणे ग्रामीण भागातील असून उरलेल्यांमधे अहमदनगर, सातारा येथील प्रत्येकी 2 तर नाशिक येथील एक पेशंट आहे.

याशिवाय सोलापूर आणि मुंबई येथील प्रत्येकी एक पेशंट पुण्यात येऊन दगावला आहे. यावेळी टॅमी फ्लूसोबत 2 व्हॅक्सिन्स उपचारासाठी उपलब्ध असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हायपरटेन्शन,डायबेटीस, एचआयव्हीबाधित, गर्भवती स्त्रिया अशा लोकांना H1N1 ची लागण होत असल्याचे दिसून आले आहे.

स्वयंसेवी संस्था तसेच राजकीय पक्षांतर्फे सिरम इन्स्टिट्यूटतर्फे विकसित केलेल्या नाकावाटे घ्यावयाच्या लसी मोफत देण्याचे उपक्रमही सुरू झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2010 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close