S M L

आंबोली घाटात दुसरी दरड कोसळली

31 जुलैआंबोली घाटात काल दरड कोसळली होती. तिथे ढिगारा उपसण्याचे काम सुरू असतानाच पुन्हा त्याच ठिकाणी आज दुसर्‍यांदा दरड कोसळली आहे. त्यामुळे आज सकाळीच सुरू झालेले ढिगारा उपसण्याचे काम ठप्प झाले आहे. ही घटना आंबोली धबधब्याशेजारी असलेल्या एका छोट्या धबधब्याजवळ घडली. या भागात पर्यटकांचा वावर असल्यामुळे काही पर्यटक ढिगार्‍याखाली दबल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सावंतवाडी-बेळगाव मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. या मार्गावरची वाहतूक दोन दिवस बंद राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2010 10:33 AM IST

आंबोली घाटात दुसरी दरड कोसळली

31 जुलै

आंबोली घाटात काल दरड कोसळली होती. तिथे ढिगारा उपसण्याचे काम सुरू असतानाच पुन्हा त्याच ठिकाणी आज दुसर्‍यांदा दरड कोसळली आहे.

त्यामुळे आज सकाळीच सुरू झालेले ढिगारा उपसण्याचे काम ठप्प झाले आहे. ही घटना आंबोली धबधब्याशेजारी असलेल्या एका छोट्या धबधब्याजवळ घडली.

या भागात पर्यटकांचा वावर असल्यामुळे काही पर्यटक ढिगार्‍याखाली दबल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सावंतवाडी-बेळगाव मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. या मार्गावरची वाहतूक दोन दिवस बंद राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2010 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close