S M L

कोल्हापुरातल्या विश्वशांती महायज्ञाला नागरिकांचा कडाडून विरोध

24 ऑक्टोबर, कोल्हापूर - कोल्हापूरमध्ये नोव्हेंबर महिन्यात विश्वशांती महायज्ञ होणार आहे. हा यज्ञ कर्मकांडावर आधारित असल्याने या यज्ञाला तीव्र विरोध होत आहे. एक अनामी संस्था कोल्हापूरला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून 2 ते 13 नोव्हेंबर दरम्यान कोल्हापुरातल्या गांधी मैदान इथे 108 पद्म कुंडील अष्टलक्ष्मी विश्वशांती महायज्ञ करणार आहे. या यज्ञामुळे कोल्हापूरचा फायदा होणार आहे, असं संयोजकांचं मत आहे. पण ज्या शहराला परोगामी विचारांचा वारसा आहे, त्या शहरात अशा प्रकारचा यज्ञ होणं म्हणजे शाहू महारांजाच्या विचाराला हरताळ फासला जात असल्याचा आरोप कोल्हापुरातील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील दिग्गज एकत्रीत येऊन अशा प्रकारचा यज्ञ होऊ न देण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी समाज प्रबोधनही सरू केलं आहे.प्रतिगामी आणि विज्ञान विरोधी लोकांनी मात्र या यज्ञाला आपला छुपा पाठिंबा व्यक्त केला आहे. पुरोगामी नागरिकांनी हा यज्ञ होऊ न देण्याचं ठरवलं आहे. तर संयोजकांनी हा यज्ञ विश्वशांतीसाठी आहे.म्हणुन तो करण्याचा निश्चय केलाय त्यामुळे हा यज्ञ वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2008 04:47 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2008 04:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close