S M L

रत्नागिरीत शीळ धरणाला भेगा

3 ऑगस्टकोकणात जमीन खचण्याच्या घटना सुरूच आहेत. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या शीळ धरणाला जमीन खचल्याने गंभीर धोका निर्माण झाला आहे. या धरणाच्या आजूबाजूच्या जमिनीला प्रचंड मोठ्या प्रमाणात भेगा गेल्या आहेत. त्यामुळे धरणातून जॅकवेलकडे जाणार्‍या कालव्याची संरक्षक भिंतही खचली आहे. त्यामुळे हा कालवा केंव्हाही बुजला जाऊन रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद पडण्याची शक्यता आहे.धरण परिसरातील सुमारे 10 एकर जमिनीत या भेगा गेल्यामुळे येथील शेतीही धोक्यात आली आहे. या सगळ्या परिस्थितीकडे रत्नागिरी नगरपरीषदेचे मात्र दुर्लक्ष आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2010 09:26 AM IST

रत्नागिरीत शीळ धरणाला भेगा

3 ऑगस्ट

कोकणात जमीन खचण्याच्या घटना सुरूच आहेत. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या शीळ धरणाला जमीन खचल्याने गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या धरणाच्या आजूबाजूच्या जमिनीला प्रचंड मोठ्या प्रमाणात भेगा गेल्या आहेत. त्यामुळे धरणातून जॅकवेलकडे जाणार्‍या कालव्याची संरक्षक भिंतही खचली आहे.

त्यामुळे हा कालवा केंव्हाही बुजला जाऊन रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद पडण्याची शक्यता आहे.

धरण परिसरातील सुमारे 10 एकर जमिनीत या भेगा गेल्यामुळे येथील शेतीही धोक्यात आली आहे.

या सगळ्या परिस्थितीकडे रत्नागिरी नगरपरीषदेचे मात्र दुर्लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close