S M L

मराठवाड्यात साथींचा फैलाव

3 ऑगस्टराज्यभरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. विशेषत: मराठवाड्यात अस्वच्छता, पिण्याचे दूषित पाणी यामुळे गॅस्ट्रो, कावीळ यांसारख्या आजारांचा फैलाव झाला आहे. जालन्यातील सरकारी हॉस्पिटलमध्येच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पेशंट्सना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पेशंटच्या गर्दीमुळे हॉस्पिटलमधील खाटाही अपुर्‍या पडत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही मोठी दुरवस्था आहे. त्यातच पुरेशा कर्मचार्‍यांअभावी सार्वजनिक आरोग्य खातेच सलाईनवर आहे. विभागातील आरोग्य उपसंचालकासह सहाय्यक संचालकाचे पद गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त आहे. जिल्हा शल्यचिकित्सकाचे पदही भरण्यात आलेले नाही.83 गावांमध्ये फैलावमराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड जिल्ह्यातील नागरिक साथीच्या रोगामुळे हैराण झाले आहेत. मलेरिया, गॅस्ट्रो, कावीळ तसेच तापामुळे हजारोजण सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात मोहन काळे या सात वर्षांच्या मुलाचा गॅस्ट्रोमुळे मृत्यू झाला. दोन महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यातील 83 गावांमध्ये साथीच्या रोगाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 196 गावे जोखीमग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत.कोल्हापुरात अधिकार्‍यांना घेरावकोल्हापुरातील H1N1 ची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत आज मनसे कार्यकर्त्यांनी महापलिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांना घेराव घातला.कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत सात जणांचा H1N1मुळे मृत्यू झाला आहे. तर 38 जणांना H1N1ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2010 11:14 AM IST

मराठवाड्यात साथींचा फैलाव

3 ऑगस्ट

राज्यभरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. विशेषत: मराठवाड्यात अस्वच्छता, पिण्याचे दूषित पाणी यामुळे गॅस्ट्रो, कावीळ यांसारख्या आजारांचा फैलाव झाला आहे.

जालन्यातील सरकारी हॉस्पिटलमध्येच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पेशंट्सना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पेशंटच्या गर्दीमुळे हॉस्पिटलमधील खाटाही अपुर्‍या पडत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही मोठी दुरवस्था आहे. त्यातच पुरेशा कर्मचार्‍यांअभावी सार्वजनिक आरोग्य खातेच सलाईनवर आहे. विभागातील आरोग्य उपसंचालकासह सहाय्यक संचालकाचे पद गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त आहे. जिल्हा शल्यचिकित्सकाचे पदही भरण्यात आलेले नाही.

83 गावांमध्ये फैलाव

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड जिल्ह्यातील नागरिक साथीच्या रोगामुळे हैराण झाले आहेत. मलेरिया, गॅस्ट्रो, कावीळ तसेच तापामुळे हजारोजण सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात मोहन काळे या सात वर्षांच्या मुलाचा गॅस्ट्रोमुळे मृत्यू झाला. दोन महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यातील 83 गावांमध्ये साथीच्या रोगाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 196 गावे जोखीमग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत.

कोल्हापुरात अधिकार्‍यांना घेराव

कोल्हापुरातील H1N1 ची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत आज मनसे कार्यकर्त्यांनी महापलिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांना घेराव घातला.

कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत सात जणांचा H1N1मुळे मृत्यू झाला आहे. तर 38 जणांना H1N1ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close