S M L

बेळगावच्या मुद्द्यावरून लोकसभा स्थगित

3 ऑगस्टबेळगावच्या मुद्द्यावरून आज लोकसभेचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आले.महागाईच्या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काही खासदार गोंधळ घालत असतानाच महाराष्ट्राच्या खासदारांनी बेळगावरून आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे सभागृहात पूर्णपणे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बेळगावप्रश्नी केंद्र सरकारने महाराष्ट्राशी सापत्न वागणूक थांबवावी, कर्नाटक सरकारने बेळगावमधील मराठी भाषकांवरील अन्याय, अत्याचार थांबवावा अशी, जोरदार मागणी यावेळी महाराष्ट्रातील खासदारांनी केली. त्यामुळे अध्यक्ष मीराकुमार यांना कामकाज 40 मिनिटांसाठी स्थगित करावे लागले. त्यानंतर 11 वाजून 40 मिनिटांनी लोकसभेचे कामकाज सुरू करण्यात आले. तर राज्यसभेतही कॉमनवेल्थमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2010 12:58 PM IST

बेळगावच्या मुद्द्यावरून लोकसभा स्थगित

3 ऑगस्ट

बेळगावच्या मुद्द्यावरून आज लोकसभेचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आले.

महागाईच्या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काही खासदार गोंधळ घालत असतानाच महाराष्ट्राच्या खासदारांनी बेळगावरून आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे सभागृहात पूर्णपणे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

बेळगावप्रश्नी केंद्र सरकारने महाराष्ट्राशी सापत्न वागणूक थांबवावी, कर्नाटक सरकारने बेळगावमधील मराठी भाषकांवरील अन्याय, अत्याचार थांबवावा अशी, जोरदार मागणी यावेळी महाराष्ट्रातील खासदारांनी केली. त्यामुळे अध्यक्ष मीराकुमार यांना कामकाज 40 मिनिटांसाठी स्थगित करावे लागले.

त्यानंतर 11 वाजून 40 मिनिटांनी लोकसभेचे कामकाज सुरू करण्यात आले. तर राज्यसभेतही कॉमनवेल्थमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close