S M L

कॉलर ट्यूनवर लागणार करमणूक कर

3 ऑगस्टमोबाईलवर ऐकायला मिळणार्‍या कॉलर ट्यूनवर करमणूक कर लावण्याचा सरकारचा विचार आहे. कॉलर ट्यूनसोबतच सायबर कॅफे, व्हिडिओ पार्लर्सवरही कर लावण्याचा सरकारचा विचार आहे. कुठल्याही मोबाईल धारकाने दुसर्‍याला फोन केल्यानंतर त्याला ऐकायला मिळणारी कॉलर ट्यून त्याचे मनोरंजन करते. त्यामुळे आता त्यावर करमणूक कर लावण्याचा सरकारचा विचार आहे. मोबाईलवर कॉलर ट्यून सुरू करण्यासाठी दरमहा 30 रुपये भरावे लागतात. आता त्याच्यावरच 25 टक्के करमणूक कर लावण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव रमेश कुमार यांनी ही माहिती दिली. मंजुरीसाठी हा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला. नंतर तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळापुढे मांडला जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2010 03:52 PM IST

कॉलर ट्यूनवर लागणार करमणूक कर

3 ऑगस्ट

मोबाईलवर ऐकायला मिळणार्‍या कॉलर ट्यूनवर करमणूक कर लावण्याचा सरकारचा विचार आहे. कॉलर ट्यूनसोबतच सायबर कॅफे, व्हिडिओ पार्लर्सवरही कर लावण्याचा सरकारचा विचार आहे.

कुठल्याही मोबाईल धारकाने दुसर्‍याला फोन केल्यानंतर त्याला ऐकायला मिळणारी कॉलर ट्यून त्याचे मनोरंजन करते. त्यामुळे आता त्यावर करमणूक कर लावण्याचा सरकारचा विचार आहे.

मोबाईलवर कॉलर ट्यून सुरू करण्यासाठी दरमहा 30 रुपये भरावे लागतात. आता त्याच्यावरच 25 टक्के करमणूक कर लावण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव रमेश कुमार यांनी ही माहिती दिली. मंजुरीसाठी हा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला. नंतर तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळापुढे मांडला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close