S M L

कलमाडी चौकशीसाठी तयार

4 ऑगस्टकॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीवर ताशेरे मारले जात असतानाच आता आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी आता आपण कुठल्याही चौकशीला सामोरे जाणार असल्याचे म्हटले आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या तयारीदरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. दरम्यान कॉमनवेल्थ स्पर्धा 2010चे मुख्य पुरस्कर्ते भारतीय रेल्वेनेही या सगळ्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच रेल्वेने यासंदर्भात आयोजन समितीकडे स्पष्टीकरण मागितले आहे. रेल्वेने या स्पर्धेसाठी 100 कोटी रूपयांचे अनुदान दिले आहे. रेल्वे आपले अनुदान सध्या तरी परत घेणार नसली, तरी स्पष्टीकरणानंतर यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. कलमाडी यांनी नेमलेल्या तीन सदस्यांची समिती आज आपला अहवालही सादर करणार आहे.हा मुद्दा संसदेत चर्चेसाठी आणण्याचा भाजप आणि डाव्यांचा प्रयत्न आहे. संयुक्त संसदीय समितीतर्फे या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2010 08:49 AM IST

कलमाडी चौकशीसाठी तयार

4 ऑगस्ट

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीवर ताशेरे मारले जात असतानाच आता आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी आता आपण कुठल्याही चौकशीला सामोरे जाणार असल्याचे म्हटले आहे.

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या तयारीदरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. दरम्यान कॉमनवेल्थ स्पर्धा 2010चे मुख्य पुरस्कर्ते भारतीय रेल्वेनेही या सगळ्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.

तसेच रेल्वेने यासंदर्भात आयोजन समितीकडे स्पष्टीकरण मागितले आहे. रेल्वेने या स्पर्धेसाठी 100 कोटी रूपयांचे अनुदान दिले आहे. रेल्वे आपले अनुदान सध्या तरी परत घेणार नसली, तरी स्पष्टीकरणानंतर यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

कलमाडी यांनी नेमलेल्या तीन सदस्यांची समिती आज आपला अहवालही सादर करणार आहे.

हा मुद्दा संसदेत चर्चेसाठी आणण्याचा भाजप आणि डाव्यांचा प्रयत्न आहे. संयुक्त संसदीय समितीतर्फे या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2010 08:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close