S M L

कॉमनवेल्थ कोषाध्यक्ष पायउतार

5 ऑगस्टकॉमनवेल्थमधील भ्रष्टाचाराच्या साथीत आज पहिला बळी गेला. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीचे कोषाध्यक्ष अनिल खन्ना यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. कॉमनवेल्थ आयोजन समितीवर भ्रष्ट्राचाराचे अनेक आरोप होत आहेत. त्याच्यातच अनिल खन्नांवरही भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे.आपल्या मुलाला या स्पर्धेसाठी टेनिस कोर्टचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिल्याचा आरोप खन्ना यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळेच कदाचित त्यांनी या पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. कलमाडींविरोधात निदर्शनेकॉमनवेल्थ भ्रष्टाचारप्रकरणी वादात सापडलेले सुरेश कलमाडी यांच्या विरोधात भाजपने आज पुण्यात निदर्शने केली. कलमाडी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलकांनी केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कलमाडींच्या पुतळ्याला पैशांचा हार घातला. यावेळी कलमाडींविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. दरम्यान याप्रकरणी चौकशी सुरू असून भाजप आणि शिवसेना या प्रकरणाचे राजकारण करत असल्याची प्रतिक्रिया पुणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभय छाजेड यांनी म्हटले आहे. तर या आंदोलनानंतर पोलिसांनी कलमाडींना सुरक्षा पुरवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2010 11:02 AM IST

कॉमनवेल्थ कोषाध्यक्ष पायउतार

5 ऑगस्ट

कॉमनवेल्थमधील भ्रष्टाचाराच्या साथीत आज पहिला बळी गेला. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीचे कोषाध्यक्ष अनिल खन्ना यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला.

कॉमनवेल्थ आयोजन समितीवर भ्रष्ट्राचाराचे अनेक आरोप होत आहेत. त्याच्यातच अनिल खन्नांवरही भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे.

आपल्या मुलाला या स्पर्धेसाठी टेनिस कोर्टचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिल्याचा आरोप खन्ना यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळेच कदाचित त्यांनी या पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

कलमाडींविरोधात निदर्शने

कॉमनवेल्थ भ्रष्टाचारप्रकरणी वादात सापडलेले सुरेश कलमाडी यांच्या विरोधात भाजपने आज पुण्यात निदर्शने केली. कलमाडी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलकांनी केली.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कलमाडींच्या पुतळ्याला पैशांचा हार घातला. यावेळी कलमाडींविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

दरम्यान याप्रकरणी चौकशी सुरू असून भाजप आणि शिवसेना या प्रकरणाचे राजकारण करत असल्याची प्रतिक्रिया पुणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभय छाजेड यांनी म्हटले आहे.

तर या आंदोलनानंतर पोलिसांनी कलमाडींना सुरक्षा पुरवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2010 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close