S M L

भारताने तिसरी टेस्ट जिंकली

07 ऑगस्टकोलंबो टेस्ट जिंकत भारतानं यजमान श्रीलंकेवर 5 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. व्हि व्ही एस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकरने केलेल्या दमदार बॅटिंगच्या जोरावर भारताने श्रीलंकेला त्यांच्याच भूमित हरवत 3 मॅचची ही सीरिजही 1-1 अशी बरोबरीत सोडवली आहे.या विजयामुळे भारताने टेस्ट क्रमवारीतील आपलं पहिलं स्थानही भक्कम केलं आहे. भारताच्या खात्यात आता 127 पॉईंट आहेत. श्रीलंकेनं विजयासाठी ठेवलेल्या 257 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना भारताची सुरुवात थोडीशी खराब झाली होती. वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय आणि राहुल द्रविड हे प्रमुख बॅट्समन झटपट आऊट झाले. पण त्यानंतर सचिननं 54 रन्सची शानदार इनिंग खेळत भारताच्या विजयाच्या आशा जिंवत ठेवल्या. श्रीलंकेच्या सुरज रणदीव याने पाच विकेट घेत मॅचमध्ये रंगत निर्माण केली. यानंतर भारताचा अनुभवी बॅट्समन लक्ष्मणने संयमी बॅटींग करत भारताला विजय मिळवून दिला आणि सुरेश रैनानेही त्याला चांगली साथ दिली. श्रीलंकेच्या भूमित भारताला शानदार विजय मिळवून दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 7, 2010 11:04 AM IST

भारताने तिसरी टेस्ट जिंकली

07 ऑगस्ट

कोलंबो टेस्ट जिंकत भारतानं यजमान श्रीलंकेवर 5 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. व्हि व्ही एस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकरने केलेल्या दमदार बॅटिंगच्या जोरावर भारताने श्रीलंकेला त्यांच्याच भूमित हरवत 3 मॅचची ही सीरिजही 1-1 अशी बरोबरीत सोडवली आहे.

या विजयामुळे भारताने टेस्ट क्रमवारीतील आपलं पहिलं स्थानही भक्कम केलं आहे. भारताच्या खात्यात आता 127 पॉईंट आहेत. श्रीलंकेनं विजयासाठी ठेवलेल्या 257 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना भारताची सुरुवात थोडीशी खराब झाली होती. वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय आणि राहुल द्रविड हे प्रमुख बॅट्समन झटपट आऊट झाले. पण त्यानंतर सचिननं 54 रन्सची शानदार इनिंग खेळत भारताच्या विजयाच्या आशा जिंवत ठेवल्या. श्रीलंकेच्या सुरज रणदीव याने पाच विकेट घेत मॅचमध्ये रंगत निर्माण केली. यानंतर भारताचा अनुभवी बॅट्समन लक्ष्मणने संयमी बॅटींग करत भारताला विजय मिळवून दिला आणि सुरेश रैनानेही त्याला चांगली साथ दिली. श्रीलंकेच्या भूमित भारताला शानदार विजय मिळवून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2010 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close