S M L

लेहमध्ये ढगफुटीत 112 बळी

07 ऑगस्टलेहमधल्या ढगफुटीला 24 तासांहून जास्त वेळ उलटून गेले आहे. आज सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे मदतकार्यात पुन्हा अडथळे येत होते. पण आता पावसाचा जोर कमी झाल्याने पीडितांच्या मदतीसाठी विमान सेवा सुरूळीत होतआहे.ढगफुटीमुळे बळी गेलेल्यांचा आकडा आता 112 वर पोहोचलाय, तर 400 जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सियाचेन प्रांतात काल दरड कोसळली होती त्यानंतर तिथल्या कॅम्पमधले 20 जवान बेपत्ता झाले. एकूण 500 जणांचा शोध अजूनही सुरू आहे. येत्या 48 तासांत लेहमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या पर्यटकांना,परत आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे त्यासाठी मुंबईत हेल्प लाईनही सुरु करण्यात आली. तसेच आज सकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जम्मू कश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांशी चर्चा केली. यावेळी अब्दुल्ला यांनी चव्हाण यांना सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिल्याचं समजतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 7, 2010 11:11 AM IST

लेहमध्ये ढगफुटीत 112 बळी

07 ऑगस्ट

लेहमधल्या ढगफुटीला 24 तासांहून जास्त वेळ उलटून गेले आहे. आज सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे मदतकार्यात पुन्हा अडथळे येत होते. पण आता पावसाचा जोर कमी झाल्याने पीडितांच्या मदतीसाठी विमान सेवा सुरूळीत होतआहे.

ढगफुटीमुळे बळी गेलेल्यांचा आकडा आता 112 वर पोहोचलाय, तर 400 जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सियाचेन प्रांतात काल दरड कोसळली होती त्यानंतर तिथल्या कॅम्पमधले 20 जवान बेपत्ता झाले. एकूण 500 जणांचा शोध अजूनही सुरू आहे. येत्या 48 तासांत लेहमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या पर्यटकांना,परत आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे त्यासाठी मुंबईत हेल्प लाईनही सुरु करण्यात आली. तसेच आज सकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जम्मू कश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांशी चर्चा केली. यावेळी अब्दुल्ला यांनी चव्हाण यांना सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिल्याचं समजतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2010 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close