S M L

500 मेट्रीक टन तेल समुद्रात : ऑपरेशन चित्रा सुरुच

09 ऑगस्टएमएससी चित्रा आणि खलीजीया-3 या मालवाहू जहाजांच्या टकरीमुळे समुद्रात सुमारे दोन मैलांच्या परिसरीत तेलाचा तवंग पसरला आहे. जहाजांच्या धडकेनंतर 789 टन तेल समुद्रात पसरलं असून ते नष्ट करण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागणार आहे. मुंबईत जेएनपीटीजवळ समुद्रात पसरलेलं तेल काढण्यासाठी वेगात प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी या मालवाहू जहाजांची टक्कर झाली होती . त्यापैकी एका जहाजावर असणारे तेलाचे टँकर्स समुद्रात बुडाले आहे. त्यामुळे मुंबईत जेएनपीटीजवळ समुद्रात तेल पसरलं. शुक्रवारी टक्कर झालेल्या जहाजावरील 500 मेट्रीक टन समुद्रात वाहून गेलंय तर जहाजावर अजूनही 2100 मेट्रीक टन तेल शिल्लक आहे. समुद्रातल्या पाण्याची सफाई करण्यासाठी कोस्टगार्डची जहाजं युद्धपातळीवर काम करत आहे. तसेच तेल काढण्यासाठी हेलिकॉप्टर्समधूनही रसायनांची फवारणी करण्यात येत आहे. कोस्टगार्डला मदत करण्यासाठी आता हॉलंडहून तज्ज्ञांची टीम इथे येणार आहे.मुंबईतल्या या समुद्रातील परिसरात मासेमारी करू नये. तसंच इथले मासे खाऊ नये, असं आवाहन पर्यावरण मंत्रालयाच्या मुख्य सचिव वल्सा नायर यांनी केलं आहे. मुंबई महानगरपालिकेनेही मुंबईकरांना मासे न खाण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री म्हणतात परिस्थीती नियंत्रणात नाहीदोन मालवाहू जहाजांच्या धडकेनंतर अरबी समुद्रात तेल गळती झाल्याने राज्य सरकारने मासेमारीवर बंदी घातली आहे. पण सरकारच्या या निर्णयावर मच्छिमारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तेलामुळे झालेलं प्रदूषण रोखण्यासाठी काम सुरू आहे. पण हे अतिशय अवघड काम आहे, असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तसेच घटनेशी संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई कऱणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तर तेल पसरल्यामुळे झालेलं प्रदूषण रोखण्यासाठी कोस्टगार्डने BNHS ची मदत मागितली आहे. दरम्यान, मच्छिमारांनी सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी केली.शनिवारी सकाळी 9.40 वाजता एमएससी चित्रा मुंबई बंदरातून गुजरातकडे निघाली होतीएमव्ही खलिजीया मुंबई बंदरात दुरुस्तीसाठी येत होतीएमएससी चित्रावर 1,219 कार्गो कंटेनर होतेएमएससी चित्रावर 2,662 टन इंधन, 283 टन डिझेल आणि 88,040 लिटर तेल होतंएमव्ही खलिजीयावर 13 हजार टन कार्गो माल होताएमव्ही खलिजीया अगोदर झालेल्या एका अपघातानंतर 15 दिवसांनी दुरुस्तीसाठी मुंबई बंदरात येत होतीदोन्ही जहाजं दोन वेगळ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरत होत्याधडकेनंतर एमएससी चित्रा कलंडली आणि सुमारे 400 कंटेनर समुद्रात पडलेएमएससी चित्रातून तेलगळती होत आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2010 11:17 AM IST

500 मेट्रीक टन तेल समुद्रात : ऑपरेशन चित्रा सुरुच

09 ऑगस्ट

एमएससी चित्रा आणि खलीजीया-3 या मालवाहू जहाजांच्या टकरीमुळे समुद्रात सुमारे दोन मैलांच्या परिसरीत तेलाचा तवंग पसरला आहे. जहाजांच्या धडकेनंतर 789 टन तेल समुद्रात पसरलं असून ते नष्ट करण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागणार आहे. मुंबईत जेएनपीटीजवळ समुद्रात पसरलेलं तेल काढण्यासाठी वेगात प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी या मालवाहू जहाजांची टक्कर झाली होती . त्यापैकी एका जहाजावर असणारे तेलाचे टँकर्स समुद्रात बुडाले आहे. त्यामुळे मुंबईत जेएनपीटीजवळ समुद्रात तेल पसरलं. शुक्रवारी टक्कर झालेल्या जहाजावरील 500 मेट्रीक टन समुद्रात वाहून गेलंय तर जहाजावर अजूनही 2100 मेट्रीक टन तेल शिल्लक आहे. समुद्रातल्या पाण्याची सफाई करण्यासाठी कोस्टगार्डची जहाजं युद्धपातळीवर काम करत आहे. तसेच तेल काढण्यासाठी हेलिकॉप्टर्समधूनही रसायनांची फवारणी करण्यात येत आहे. कोस्टगार्डला मदत करण्यासाठी आता हॉलंडहून तज्ज्ञांची टीम इथे येणार आहे.

मुंबईतल्या या समुद्रातील परिसरात मासेमारी करू नये. तसंच इथले मासे खाऊ नये, असं आवाहन पर्यावरण मंत्रालयाच्या मुख्य सचिव वल्सा नायर यांनी केलं आहे. मुंबई महानगरपालिकेनेही मुंबईकरांना मासे न खाण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री म्हणतात परिस्थीती नियंत्रणात नाही

दोन मालवाहू जहाजांच्या धडकेनंतर अरबी समुद्रात तेल गळती झाल्याने राज्य सरकारने मासेमारीवर बंदी घातली आहे. पण सरकारच्या या निर्णयावर मच्छिमारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तेलामुळे झालेलं प्रदूषण रोखण्यासाठी काम सुरू आहे. पण हे अतिशय अवघड काम आहे, असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तसेच घटनेशी संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई कऱणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तर तेल पसरल्यामुळे झालेलं प्रदूषण रोखण्यासाठी कोस्टगार्डने BNHS ची मदत मागितली आहे. दरम्यान, मच्छिमारांनी सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी केली.

शनिवारी सकाळी 9.40 वाजता

एमएससी चित्रा मुंबई बंदरातून गुजरातकडे निघाली होतीएमव्ही खलिजीया मुंबई बंदरात दुरुस्तीसाठी येत होतीएमएससी चित्रावर 1,219 कार्गो कंटेनर होतेएमएससी चित्रावर 2,662 टन इंधन, 283 टन डिझेल आणि 88,040 लिटर तेल होतंएमव्ही खलिजीयावर 13 हजार टन कार्गो माल होताएमव्ही खलिजीया अगोदर झालेल्या एका अपघातानंतर 15 दिवसांनी दुरुस्तीसाठी मुंबई बंदरात येत होतीदोन्ही जहाजं दोन वेगळ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरत होत्याधडकेनंतर एमएससी चित्रा कलंडली आणि सुमारे 400 कंटेनर समुद्रात पडलेएमएससी चित्रातून तेलगळती होत आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2010 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close