S M L

तेलगळती थांबली : धोका कायम

09 ऑगस्टमुंबईत जेएनपीटीजवळ शनिवारी एमएससी चित्रा आणि खलीजिया या दोन जहाजांच्या टकरीनंतर एमएससी चित्रा या जहाजातून होणार्‍या तेलगळतीला थांबवण्यात सोमवारी संध्याकाळी यश आलं. या जहाजांच्या अपघातानंतर समुद्रात सुमारे 800 टन तेल पसरलंय. समुद्रातल्या पाण्याची सफाई करण्यासाठी कोस्टगार्डची जहाजं युद्धपातळीवर काम करत आहे. या परिसरात 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी करू नये. तसेच मासे खाऊ नये, असं आवाहन पर्यावरण मंत्रालयाने केलं आहे.सोमवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हेलिकॉप्टरमधून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की समुद्रात पसरलेलं तेल अजून समुद्र किनार्‍यापर्यंत पोहोचलेलं नाही. टक्कर झालेल्या दोन जहाजांपैकी एक जहाज बाहेर काढण्यात आलं आहे. तर दुसरं जहाज समुद्रातच आहे. या जहाजावर जवळपास 2600 मेट्रीक टन तेल होतं. ज्या कंपनीचं हे जहाज आहे त्या कंपनीने सिंगापूरच्या तज्ज्ञांच्या मदतीने कंटेनर काढण्याचं काम सुरू केलं आहे. दोन्ही जहाजांच्या कॅप्टनविरोधात तक्रार दाखल केली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच संबंधित कंपन्यांकडून नुकसान भरपाई वसूल केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2010 04:20 PM IST

तेलगळती थांबली : धोका कायम

09 ऑगस्ट

मुंबईत जेएनपीटीजवळ शनिवारी एमएससी चित्रा आणि खलीजिया या दोन जहाजांच्या टकरीनंतर एमएससी चित्रा या जहाजातून होणार्‍या तेलगळतीला थांबवण्यात सोमवारी संध्याकाळी यश आलं. या जहाजांच्या अपघातानंतर समुद्रात सुमारे 800 टन तेल पसरलंय. समुद्रातल्या पाण्याची सफाई करण्यासाठी कोस्टगार्डची जहाजं युद्धपातळीवर काम करत आहे. या परिसरात 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी करू नये. तसेच मासे खाऊ नये, असं आवाहन पर्यावरण मंत्रालयाने केलं आहे.

सोमवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हेलिकॉप्टरमधून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की समुद्रात पसरलेलं तेल अजून समुद्र किनार्‍यापर्यंत पोहोचलेलं नाही. टक्कर झालेल्या दोन जहाजांपैकी एक जहाज बाहेर काढण्यात आलं आहे. तर दुसरं जहाज समुद्रातच आहे. या जहाजावर जवळपास 2600 मेट्रीक टन तेल होतं. ज्या कंपनीचं हे जहाज आहे त्या कंपनीने सिंगापूरच्या तज्ज्ञांच्या मदतीने कंटेनर काढण्याचं काम सुरू केलं आहे. दोन्ही जहाजांच्या कॅप्टनविरोधात तक्रार दाखल केली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच संबंधित कंपन्यांकडून नुकसान भरपाई वसूल केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2010 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close