S M L

H1N1ग्रस्त रुग्णाच्या कुटुंबावर बहिष्कार

09 ऑगस्टसांगली जिल्ह्यातील नाद्रे येथे H1N1ग्रस्त रुग्णाच्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.संजय कुंभार आणि लक्ष्मी कुंभार यांना स्वाईन फ्लू झाल्यानं नाद्रे गावातील बहुसंख्य लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. तसेच त्यांच्याशी संपर्क तोडून, त्यांच्या दैनंदिन व्यवहारापासून दूर ठेवण्यात आले आहे.कुंभार दांपत्याला H1N1 झाल्यानं त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले त्यांची H1N1 पासून सुटका झाली. पण या कुटुंबाशी संपर्क ठेवल्यास संसर्गामुळे आपल्याला H1N1 होईल या भीतीने गावकर्‍यांनी त्यांना वाळीत टाकले आहे. तसेच घरासमोरच्या दारानं ये-जा करण्यास मज्जाव केला आहे. त्यांच्या दीड वर्षाच्या लहान मुलीला संसर्ग होऊ नये, म्हणून डॉक्टरांनी त्या दोघांना मास्क वापरायला सांगितले मात्र सगळ्या गावात मात्र या मास्कमुळेच घबराटीचं वातावरण पसरले आहे.गावकरी त्यांना कोणतीही मदत करणे आणि त्यांच्याशी साधे बोलणेही टाळत आहेत.H1N1 आटोक्यात आणण्यासाठी शासकीय स्तरावर सरकार कसून प्रयत्न करीत आहे. पण लोकांच्या मनातील या रोगाबाबतची भीती कशी दूर करणार हा पेच आता येथील आरोग्य यंत्रणेसमोर पडला आहे. औषध उपचाराबरोबरच आता जनजामृती मोहिमही तितक्यात प्रभावीपणे खेड्यापाड्यात राबवणं गरजेचं बनलंय हे या प्रकारावरून समोर आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2010 04:27 PM IST

H1N1ग्रस्त रुग्णाच्या कुटुंबावर बहिष्कार

09 ऑगस्ट

सांगली जिल्ह्यातील नाद्रे येथे H1N1ग्रस्त रुग्णाच्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.संजय कुंभार आणि लक्ष्मी कुंभार यांना स्वाईन फ्लू झाल्यानं नाद्रे गावातील बहुसंख्य लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. तसेच त्यांच्याशी संपर्क तोडून, त्यांच्या दैनंदिन व्यवहारापासून दूर ठेवण्यात आले आहे.

कुंभार दांपत्याला H1N1 झाल्यानं त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले त्यांची H1N1 पासून सुटका झाली. पण या कुटुंबाशी संपर्क ठेवल्यास संसर्गामुळे आपल्याला H1N1 होईल या भीतीने गावकर्‍यांनी त्यांना वाळीत टाकले आहे. तसेच घरासमोरच्या दारानं ये-जा करण्यास मज्जाव केला आहे. त्यांच्या दीड वर्षाच्या लहान मुलीला संसर्ग होऊ नये, म्हणून डॉक्टरांनी त्या दोघांना मास्क वापरायला सांगितले मात्र सगळ्या गावात मात्र या मास्कमुळेच घबराटीचं वातावरण पसरले आहे.गावकरी त्यांना कोणतीही मदत करणे आणि त्यांच्याशी साधे बोलणेही टाळत आहेत.

H1N1 आटोक्यात आणण्यासाठी शासकीय स्तरावर सरकार कसून प्रयत्न करीत आहे. पण लोकांच्या मनातील या रोगाबाबतची भीती कशी दूर करणार हा पेच आता येथील आरोग्य यंत्रणेसमोर पडला आहे. औषध उपचाराबरोबरच आता जनजामृती मोहिमही तितक्यात प्रभावीपणे खेड्यापाड्यात राबवणं गरजेचं बनलंय हे या प्रकारावरून समोर आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2010 04:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close