S M L

वाघ आणि बिबट्याचा हैदोस

17 ऑगस्टराज्याच्या विविध भागात वाघ आणि बिबट्याने धुमाकुळ घातल्याच्या घटना घडल्या. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका सहा वर्षाच्या मुलीचा बळी गेला तर चार जण जखमी झाले.मुंबईपासून अवघ्या 130 किलोमीटरवर असणार्‍या माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मुरबाड तालुक्यातील फागुल-गव्हाण गावात साखरबाडीत शनिवारी रात्री बिबट्या घुसला होता. रात्री साडेआठच्या सुमारास सुमन पारधी या सहा वर्षाच्या मुलीला आपल्या जबड्यात पकडून बिबट्या घेऊन गेला. रविवारी सुमनचा मृतदेह सापडला. या परिसरात मागील सात दिवसात बिबट्याचा वावर आहे. याच बिबट्यानं एक बकरी आणि कुत्र्याला याआधी आपलं भक्ष्य बनवलं आहे.तर चंद्रपुर जिल्ह्यातील बोथली गावाजवळ पट्टेदार वाघाने चार लोकांना जखमी केले आहे. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचार्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. चार लोकांना जखमी करुन वाघ गावाजवळच बसून आहे. परिसरातील गावातील लोकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील एक महिन्यातील अशाप्रकरची ही चौथी घटनी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2010 12:48 PM IST

वाघ आणि बिबट्याचा हैदोस

17 ऑगस्ट

राज्याच्या विविध भागात वाघ आणि बिबट्याने धुमाकुळ घातल्याच्या घटना घडल्या. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका सहा वर्षाच्या मुलीचा बळी गेला तर चार जण जखमी झाले.

मुंबईपासून अवघ्या 130 किलोमीटरवर असणार्‍या माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मुरबाड तालुक्यातील फागुल-गव्हाण गावात साखरबाडीत शनिवारी रात्री बिबट्या घुसला होता. रात्री साडेआठच्या सुमारास सुमन पारधी या सहा वर्षाच्या मुलीला आपल्या जबड्यात पकडून बिबट्या घेऊन गेला. रविवारी सुमनचा मृतदेह सापडला. या परिसरात मागील सात दिवसात बिबट्याचा वावर आहे. याच बिबट्यानं एक बकरी आणि कुत्र्याला याआधी आपलं भक्ष्य बनवलं आहे.

तर चंद्रपुर जिल्ह्यातील बोथली गावाजवळ पट्टेदार वाघाने चार लोकांना जखमी केले आहे. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचार्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. चार लोकांना जखमी करुन वाघ गावाजवळच बसून आहे. परिसरातील गावातील लोकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील एक महिन्यातील अशाप्रकरची ही चौथी घटनी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2010 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close