S M L

अणुकराराच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा

17 ऑगस्टन्यूक्लिअर लायबिलिटी बिलाबद्दल भाजपची सहमती मिळवण्यात सरकारला यश आलंय. पण त्यासाठी सरकारला दोन पावलं मागे जात विरोधकांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्यात. डाव्यांनी मात्र या विधेयकाला असलेला आपला विरोध कायम ठेवला आहे. पुरेसं संख्याबळ असल्यामुळे हे विधेयक मंजूर झाल्यावर भारत-अमेरिका अणुकराराची अंमलबजावणी लवकरच होऊ शकेल. हे विधेयक बुधवारी संसदेत मांडल्यानंतर ते सुरळीतपणे पास व्हावं याची जबाबदारी आता प्रणव मुखर्जी, पृथ्वीराज चव्हाण आणि पवन बंसल यांच्यावर टाकण्यात आली आहे.या आठवड्यात हे विधेयक पास झालं तर भारत-अमेरिका अणुकराराची अंमलबजाणी लवकरच सुरू होऊ शकते. जर हे विधेयक या आठवड्यात पास नाही झालं, तर अधिवेशनाचा कालावधी आठवड्याभरानं वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे हे विधेयक पास करण्यासाठी पंतप्रधानांवर अमेरिक ा दबाव आणत असल्याचा डाव्यांनी आरोप केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2010 05:32 PM IST

अणुकराराच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा

17 ऑगस्ट

न्यूक्लिअर लायबिलिटी बिलाबद्दल भाजपची सहमती मिळवण्यात सरकारला यश आलंय. पण त्यासाठी सरकारला दोन पावलं मागे जात विरोधकांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्यात. डाव्यांनी मात्र या विधेयकाला असलेला आपला विरोध कायम ठेवला आहे. पुरेसं संख्याबळ असल्यामुळे हे विधेयक मंजूर झाल्यावर भारत-अमेरिका अणुकराराची अंमलबजावणी लवकरच होऊ शकेल.

हे विधेयक बुधवारी संसदेत मांडल्यानंतर ते सुरळीतपणे पास व्हावं याची जबाबदारी आता प्रणव मुखर्जी, पृथ्वीराज चव्हाण आणि पवन बंसल यांच्यावर टाकण्यात आली आहे.

या आठवड्यात हे विधेयक पास झालं तर भारत-अमेरिका अणुकराराची अंमलबजाणी लवकरच सुरू होऊ शकते. जर हे विधेयक या आठवड्यात पास नाही झालं, तर अधिवेशनाचा कालावधी आठवड्याभरानं वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे हे विधेयक पास करण्यासाठी पंतप्रधानांवर अमेरिक ा दबाव आणत असल्याचा डाव्यांनी आरोप केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2010 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close