S M L

वाळूमाफीयांची दहशत : तहसिलदारावर झाडली गोळी

18 ऑगस्टअहमदनगरमध्ये दिवसेंदिवस वाळू माफीयांची दहशत वाढत चालली आहे. प्रवरा नदीच्या पात्रात बेकायदा वाळू वाहतूक करणार्‍या वाळू तस्करांवर कारवाई करायला गेलेल्या तहसिलदारांवरच गावठी कट्यातून गोळ्या झाडण्याची खळबळजनक घटना नेवासा इथे घडलीये. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना नेवासा पोलीस स्टेशनच्या आवारातच घडली. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. गाड्यांवर कारवाई करण्यासाठी तहसिलदारांचं पथक घटनास्थळी गेलं होतं. माजी उपसरंपच असलेल्या किशोर उपळकर यान तहसिलदाराच्या दिशेने आपल्या गावठी कट्‌ट्यातून गोळ्या झाडल्या. प्रत्युतरात पोलीस निरीक्षक गावंडे यांनीही आरोपीच्या दिशेने गोळ्या झाडल्या. यात अशोक उपळकर याच्या पायाला गोळी चाटून गेली. त्यात तो किरकोळ जखमी झालाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 18, 2010 01:50 PM IST

वाळूमाफीयांची दहशत : तहसिलदारावर झाडली गोळी

18 ऑगस्ट

अहमदनगरमध्ये दिवसेंदिवस वाळू माफीयांची दहशत वाढत चालली आहे. प्रवरा नदीच्या पात्रात बेकायदा वाळू वाहतूक करणार्‍या वाळू तस्करांवर कारवाई करायला गेलेल्या तहसिलदारांवरच गावठी कट्यातून गोळ्या झाडण्याची खळबळजनक घटना नेवासा इथे घडलीये. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना नेवासा पोलीस स्टेशनच्या आवारातच घडली. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

गाड्यांवर कारवाई करण्यासाठी तहसिलदारांचं पथक घटनास्थळी गेलं होतं. माजी उपसरंपच असलेल्या किशोर उपळकर यान तहसिलदाराच्या दिशेने आपल्या गावठी कट्‌ट्यातून गोळ्या झाडल्या. प्रत्युतरात पोलीस निरीक्षक गावंडे यांनीही आरोपीच्या दिशेने गोळ्या झाडल्या. यात अशोक उपळकर याच्या पायाला गोळी चाटून गेली. त्यात तो किरकोळ जखमी झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2010 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close