S M L

खासदारांना अजून पगारवाढ पाहिजे

20 ऑगस्ट खासदारांचा पगार आता पन्नास हजारपर्यंत वाढवण्यात आला आहे. काही दिवसांपासून खासदारांचा पगार वाढवण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. पण सरकारनं काही काळ ही मागणी लांबणीवर टाकली होती. पण अखेर आज झालेल्या बैठकीत, खासदारांना पगार वाढ देण्यात आली. खासदारांचा पगार आता पन्नास हजारपर्यंत वाढवण्यात आला आहे. पण इतकं करुनही जास्त पगारवाढ पाहिजे अशी मागणी करत खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला. मुलायमसिंग यादव आणि लालुप्रसाद यादव यांनी तातडीनं चर्चेची मागणी केली आहे तर बिल सभागृहात मांडण्यात आल्यावर चर्चा करू असं सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.- खासदारांच्या पगारात 300 टक्क्यांनी वाढ करण्यात आली- खासदारांना 50 हजारांपर्यंतची पगारवाढ मंजूर करण्यात आली- सेक्रेटरियल अलाऊंसमध्ये 20 हजारांची वाढ करण्यात आली- या पगारवाढीमुळे 142 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकारवर पडणार आहे- डीएमध्ये कोणतीही वाढ नाही- वर्षभरातून 35 ते 50 वेळा मोफत हवाई प्रवास करण्याची मागणी खासदारांनी केली होती पण ती मागणी नाकारण्यात आली

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2010 05:37 PM IST

खासदारांना अजून पगारवाढ पाहिजे

20 ऑगस्ट

खासदारांचा पगार आता पन्नास हजारपर्यंत वाढवण्यात आला आहे. काही दिवसांपासून खासदारांचा पगार वाढवण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. पण सरकारनं काही काळ ही मागणी लांबणीवर टाकली होती. पण अखेर आज झालेल्या बैठकीत, खासदारांना पगार वाढ देण्यात आली. खासदारांचा पगार आता पन्नास हजारपर्यंत वाढवण्यात आला आहे. पण इतकं करुनही जास्त पगारवाढ पाहिजे अशी मागणी करत खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला. मुलायमसिंग यादव आणि लालुप्रसाद यादव यांनी तातडीनं चर्चेची मागणी केली आहे तर बिल सभागृहात मांडण्यात आल्यावर चर्चा करू असं सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

- खासदारांच्या पगारात 300 टक्क्यांनी वाढ करण्यात आली- खासदारांना 50 हजारांपर्यंतची पगारवाढ मंजूर करण्यात आली- सेक्रेटरियल अलाऊंसमध्ये 20 हजारांची वाढ करण्यात आली- या पगारवाढीमुळे 142 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकारवर पडणार आहे- डीएमध्ये कोणतीही वाढ नाही- वर्षभरातून 35 ते 50 वेळा मोफत हवाई प्रवास करण्याची मागणी खासदारांनी केली होती पण ती मागणी नाकारण्यात आली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2010 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close