S M L

कुपोषणामुळे 3 बालकांचा मृत्यू

21 ऑगस्टऔरंगाबाद जिल्ह्यातील डोणगाव येथील अदिवासी भिल्ल समाजाच्या तीन बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे. तर 35 कुपोषणग्रस्त बालकांची प्रकृती गंभीर आहे. गंगापूर तालुक्यातल्या डोणगाव येथील गायरानावर आदिवासी भिल्ल समाजाची 20 घरं आहेत. साडेतीनशे ते चारशे लोकसंख्येच्या या वस्तीतल्या प्रत्येक घराला कुपोषणाने ग्रासलंय. आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या दुर्लक्षामुळे इथे अनेक दिवसांपासून कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. डोणगाव इथे प्राथमिक आरोग्य केंद्राचं उपकेंद्र आहे. पण तिथे डॉक्टर किंवा नर्स कुणीही नसतं. तसंच कुपोषण रोखण्यासाठी आतापर्यंत आरोग्य विभागाने कोणतीही पावलं उचललेली नाहीत. शिवाय भिल्ल समाजाच्या या लोकवस्तीवर कुणीही कधीही पोहचत नसल्यामुळं याकडे दुर्लक्ष झालंय. सध्या आणखी 35 कुपोषित मुलांची स्थिती गंभीर आहेत मात्र आरोग्य विभागानं आतापर्यंत कोणतीही पावले उचलली नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 21, 2010 02:43 PM IST

कुपोषणामुळे 3 बालकांचा मृत्यू

21 ऑगस्ट

औरंगाबाद जिल्ह्यातील डोणगाव येथील अदिवासी भिल्ल समाजाच्या तीन बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे. तर 35 कुपोषणग्रस्त बालकांची प्रकृती गंभीर आहे. गंगापूर तालुक्यातल्या डोणगाव येथील गायरानावर आदिवासी भिल्ल समाजाची 20 घरं आहेत. साडेतीनशे ते चारशे लोकसंख्येच्या या वस्तीतल्या प्रत्येक घराला कुपोषणाने ग्रासलंय. आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या दुर्लक्षामुळे इथे अनेक दिवसांपासून कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. डोणगाव इथे प्राथमिक आरोग्य केंद्राचं उपकेंद्र आहे. पण तिथे डॉक्टर किंवा नर्स कुणीही नसतं. तसंच कुपोषण रोखण्यासाठी आतापर्यंत आरोग्य विभागाने कोणतीही पावलं उचललेली नाहीत.

शिवाय भिल्ल समाजाच्या या लोकवस्तीवर कुणीही कधीही पोहचत नसल्यामुळं याकडे दुर्लक्ष झालंय. सध्या आणखी 35 कुपोषित मुलांची स्थिती गंभीर आहेत मात्र आरोग्य विभागानं आतापर्यंत कोणतीही पावले उचलली नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2010 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close