S M L

संमेलनाला लोकाश्रय हवा - डॉ. पानतावणे

21 ऑगस्टहे सर्व साहित्य संमेलनात राजकीय मंडळींचा शिरकाव होत असल्यामुळंच घडतंय, त्यामुळं पैशाच्या बळावर नव्हे तर लोकाश्रयावर संमेलनाचं आयोजन करावं, असं परखड मत पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केलं आहे. पुणे येथील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सतीश देसाई यांनी सर्व हिशेब तातडीनं जनतसमोर ठेवावेत. तसेच ठाणे येथील साहित्य संमेलनासाठी जनतेच्या पैशातून महानगरपालिका एक कोटी रुपयांची करीत असल्याची मदतही चुकीचीच आहे असंही पानतावणे यांनी म्हटलंय. पुणे येथील साहित्य संमेलनातील आर्थिक गैरव्यवहार आणि ठाणे महापालिकेकडून 84 व्या साहित्य संमेलनासाठी एक कोटी रूपयांचा निधी देण्याचा मुद्दा सध्या गाजतोय. याबाबत डॉ. पानतावणे यांनी अत्यंत परखड शब्दात टिका केली. साहित्य संमेलनाच्या निमित्तानं साहित्याशिवाय इतरच वादांवर होणार्‍या चर्चविषयीही त्यांनी खंत व्यक्त केली. त्याचबरोबर प्रसिध्द ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनीही समेलनातील आर्थिक व्यवहारांवर कठोर टिका केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 21, 2010 03:27 PM IST

संमेलनाला लोकाश्रय हवा - डॉ. पानतावणे

21 ऑगस्ट

हे सर्व साहित्य संमेलनात राजकीय मंडळींचा शिरकाव होत असल्यामुळंच घडतंय, त्यामुळं पैशाच्या बळावर नव्हे तर लोकाश्रयावर संमेलनाचं आयोजन करावं, असं परखड मत पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केलं आहे. पुणे येथील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सतीश देसाई यांनी सर्व हिशेब तातडीनं जनतसमोर ठेवावेत. तसेच ठाणे येथील साहित्य संमेलनासाठी जनतेच्या पैशातून महानगरपालिका एक कोटी रुपयांची करीत असल्याची मदतही चुकीचीच आहे असंही पानतावणे यांनी म्हटलंय.

पुणे येथील साहित्य संमेलनातील आर्थिक गैरव्यवहार आणि ठाणे महापालिकेकडून 84 व्या साहित्य संमेलनासाठी एक कोटी रूपयांचा निधी देण्याचा मुद्दा सध्या गाजतोय. याबाबत डॉ. पानतावणे यांनी अत्यंत परखड शब्दात टिका केली. साहित्य संमेलनाच्या निमित्तानं साहित्याशिवाय इतरच वादांवर होणार्‍या चर्चविषयीही त्यांनी खंत व्यक्त केली. त्याचबरोबर प्रसिध्द ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनीही समेलनातील आर्थिक व्यवहारांवर कठोर टिका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2010 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close