S M L

विश्वसाहित्य संमेलनातही हिशोबाचा घोळ

23 ऑगस्ट पुणे येथील 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण सध्या गाजत आहे. आता त्याबरोबरचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं अमेरिका आणि दुबई येथे घेतलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या हिशोबाबाबतचा वादही पुढे आला आहे. विशेष म्हणजे दुबईतील संमेलनाच्या हिशोबावरून मंडळातील पदाधिकार्‍यांमध्येच सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. या मुद्यावरून पूर्वीचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि विद्यमान अध्यक्ष उषा तांबे यांच्यातही बेबनाव झाला आहे. मात्र या आर्थिक विषयावर सध्या सोयीस्कर मौैन बाळगल्याचंच दिसून येतय.अमेरिकेतील सॅन फ्रान्सिको आणि दुबई येथे पहिले आणि दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. या दोन्ही संमेलनाच्या आर्थिक ताळेबंदाची माहिती साहित्य महामंडळाकडे उपलब्ध नाही. विशेष म्हणजे दुबई येथील संमेलनासाठी राज्य सरकारने दिलेल्या पंचवीस लाख रूपयांच्या निधीचा विनियोग कशापध्दतीन झाला याविषयीही महामंडळाने हिशेब देणं बंधनकारक आहे. मात्र त्याबाबतही महामंडळाकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे पुण्याच्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांसोबतच आता महामंडळही संमेलनाच्या हिशेबाच्या बाबतीत अडचणीत आला आहे.या मुद्यावरून पूर्वीचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि विद्यमान अध्यक्ष उषा तांबे यांच्या्‌तही बेबनाव झाला आहे. मात्र झाकली पंचवीस लाखाची या भावनेतून ते आरोप प्रत्यारोप करीत नाहीत. विश्व साहित्य संमेलनातल्या या गैरव्यवहाराविरोधात साहित्यिक क्षेत्रांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. संमेलनातल्या खर्चाचा हिशोब दिला पाहिजे, असं ज्येष्ठ साहित्यिक यु. म. पठाण यांनी म्हटलं आहे. तर, खर्चाचे हिशोब सादर करणे ही आमची जबाबदारी नसल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह के. एस. अतकरे यांचं म्हणणं आहे. तर पुण्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आर्थिक हिशोबाशी अखिल भारतीय मराठी साहित्य महांमडळाचा काहीही संबंध नाही असं महामंडळाचे तत्कालिन अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 23, 2010 10:40 AM IST

विश्वसाहित्य संमेलनातही हिशोबाचा घोळ

23 ऑगस्ट

पुणे येथील 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण सध्या गाजत आहे. आता त्याबरोबरचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं अमेरिका आणि दुबई येथे घेतलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या हिशोबाबाबतचा वादही पुढे आला आहे. विशेष म्हणजे दुबईतील संमेलनाच्या हिशोबावरून मंडळातील पदाधिकार्‍यांमध्येच सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. या मुद्यावरून पूर्वीचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि विद्यमान अध्यक्ष उषा तांबे यांच्यातही बेबनाव झाला आहे. मात्र या आर्थिक विषयावर सध्या सोयीस्कर मौैन बाळगल्याचंच दिसून येतय.

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिको आणि दुबई येथे पहिले आणि दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. या दोन्ही संमेलनाच्या आर्थिक ताळेबंदाची माहिती साहित्य महामंडळाकडे उपलब्ध नाही. विशेष म्हणजे दुबई येथील संमेलनासाठी राज्य सरकारने दिलेल्या पंचवीस लाख रूपयांच्या निधीचा विनियोग कशापध्दतीन झाला याविषयीही महामंडळाने हिशेब देणं बंधनकारक आहे. मात्र त्याबाबतही महामंडळाकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे पुण्याच्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांसोबतच आता महामंडळही संमेलनाच्या हिशेबाच्या बाबतीत अडचणीत आला आहे.

या मुद्यावरून पूर्वीचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि विद्यमान अध्यक्ष उषा तांबे यांच्या्‌तही बेबनाव झाला आहे. मात्र झाकली पंचवीस लाखाची या भावनेतून ते आरोप प्रत्यारोप करीत नाहीत. विश्व साहित्य संमेलनातल्या या गैरव्यवहाराविरोधात साहित्यिक क्षेत्रांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. संमेलनातल्या खर्चाचा हिशोब दिला पाहिजे, असं ज्येष्ठ साहित्यिक यु. म. पठाण यांनी म्हटलं आहे. तर, खर्चाचे हिशोब सादर करणे ही आमची जबाबदारी नसल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह के. एस. अतकरे यांचं म्हणणं आहे.

तर पुण्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आर्थिक हिशोबाशी अखिल भारतीय मराठी साहित्य महांमडळाचा काहीही संबंध नाही असं महामंडळाचे तत्कालिन अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2010 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close