S M L

सतीश देसाई नरमले

23 ऑगस्ट साहित्य संमेलनाच्या नावाखाली गोळा केलेल्या तब्बल 82 लाख रुपयांचा चेक सतीश देसाई यांनी साहित्य परिषदेकडे सुपुर्द केला. पण साहित्य परिषदेने अद्यापही हा चेक स्विकारलेला नाही. 5 तारखेला होणार्‍या परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याविषयी निर्णय घेणार असल्याचं परिषदेच्या पदाधिकार्‍यांकडून स्पष्ट होतं. त्यामुळे आता हे 82 लाख रुपये साहित्य महामंडळाच्या साहित्य कोषात जमा होणार ? की साहित्य परिषदेत राहणार ? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. पुण्याचं साहित्य संमेलन सुरु होण्यापुर्वी अनेक वादांमुळं गाजलं. पण संमेलन संपल्यावर वाद सुरु झाला तो जमाखर्चावरुन पुणे महानगरपालिकेला सादर केलेल्या हिशोबात संमेलनाच्या खात्यावर फक्त 12 हजार रुपये असल्याचं स्पष्ट झालं. ही बाब प्रसारमाध्यमांनी उघडकीला आणल्यानंतर त्यांनी पुण्यभुषण फाउंडेशनच्या नावावर 60 लाख रुपये असल्याचं स्पष्ट केले. पण असा संमेलनाच्या नावावर जमा केलेला पैसा खाजगी संस्थेसाठी वापरणं अयोग्य आहे असा टीकेचा भडिमार सर्वच स्तरांतून सुरु झाला, त्यानंतर शनिवारी पालकमंत्री अजित पवारांनीही तोफ डागली.खरंतर पुणे साहित्य संमेलनानं अनेक चांगले पायंडेही पाडले... मग ते छोट्या पुस्तक विक्रेत्याच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करणं असो की संमेलनाध्यक्षांना महाराष्ट्राचा दौरा करण्यासाठी निधी देणं असो, मात्र आर्थिक गैरव्यवहारांमुळं या सगळ्यावर पाणी फिरलं. निदान यापुढे तरी संमेलन कमी खर्चात आणि पारदर्शक पद्धतीनं होईल, अशीच अपेक्षा साहित्य रसिकांकडून व्यक्त होतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 23, 2010 11:32 AM IST

सतीश देसाई नरमले

23 ऑगस्ट

साहित्य संमेलनाच्या नावाखाली गोळा केलेल्या तब्बल 82 लाख रुपयांचा चेक सतीश देसाई यांनी साहित्य परिषदेकडे सुपुर्द केला. पण साहित्य परिषदेने अद्यापही हा चेक स्विकारलेला नाही. 5 तारखेला होणार्‍या परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याविषयी निर्णय घेणार असल्याचं परिषदेच्या पदाधिकार्‍यांकडून स्पष्ट होतं. त्यामुळे आता हे 82 लाख रुपये साहित्य महामंडळाच्या साहित्य कोषात जमा होणार ? की साहित्य परिषदेत राहणार ? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

पुण्याचं साहित्य संमेलन सुरु होण्यापुर्वी अनेक वादांमुळं गाजलं. पण संमेलन संपल्यावर वाद सुरु झाला तो जमाखर्चावरुन पुणे महानगरपालिकेला सादर केलेल्या हिशोबात संमेलनाच्या खात्यावर फक्त 12 हजार रुपये असल्याचं स्पष्ट झालं. ही बाब प्रसारमाध्यमांनी उघडकीला आणल्यानंतर त्यांनी पुण्यभुषण फाउंडेशनच्या नावावर 60 लाख रुपये असल्याचं स्पष्ट केले. पण असा संमेलनाच्या नावावर जमा केलेला पैसा खाजगी संस्थेसाठी वापरणं अयोग्य आहे असा टीकेचा भडिमार सर्वच स्तरांतून सुरु झाला, त्यानंतर शनिवारी पालकमंत्री अजित पवारांनीही तोफ डागली.

खरंतर पुणे साहित्य संमेलनानं अनेक चांगले पायंडेही पाडले... मग ते छोट्या पुस्तक विक्रेत्याच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करणं असो की संमेलनाध्यक्षांना महाराष्ट्राचा दौरा करण्यासाठी निधी देणं असो, मात्र आर्थिक गैरव्यवहारांमुळं या सगळ्यावर पाणी फिरलं. निदान यापुढे तरी संमेलन कमी खर्चात आणि पारदर्शक पद्धतीनं होईल, अशीच अपेक्षा साहित्य रसिकांकडून व्यक्त होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2010 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close