S M L

लाल महालातून दादोजींचा पुतळा हलवणार

25 ऑगस्टपुण्यातल्या ऐतिहासिक लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा अखेर हलवला जाणार आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत हा पुतळा हलवला जाईल, असं आश्‍वासन पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी दिलंय. आज लोकशासन आंदोलन समितीच्या वतीनं लाल महालात असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवावा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत आणि बी.जी. कोळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर महापौरांनी त्या ठिकाणी जाऊन ही घोषणा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 25, 2010 02:56 PM IST

लाल महालातून दादोजींचा पुतळा हलवणार

25 ऑगस्ट

पुण्यातल्या ऐतिहासिक लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा अखेर हलवला जाणार आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत हा पुतळा हलवला जाईल, असं आश्‍वासन पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी दिलंय. आज लोकशासन आंदोलन समितीच्या वतीनं लाल महालात असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवावा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत आणि बी.जी. कोळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर महापौरांनी त्या ठिकाणी जाऊन ही घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2010 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close