S M L

गोविंदांना प्रतीक्षा दहीहंडीची

26 ऑगस्टदहीहंडी आता जवळ आलीये आणि गोविंदा पथकांचे सरावही सुरु झाले आहेत. नाक्यावर दुमदुमणारी गोविंदाची अस्सल पारंपारिक गाणी. गोविंदा रे गोपाळाच्या आरोळीने दणाणून निघालेला परिसर. हंडी फोडण्यासाठी बाळगोपाळांचा दोन-चार मजल्यांचा थर आणि आपल्याच नाक्यावर बांधलेली हंडी फोडून बेधुंद होऊन नाचणारे बाळ गोपाळ.हे चित्र होत 6 ते7 वर्षापूर्वीच्या मुंबईतल्या बहुतेक नाक्यावरचं...जमाना बदलला, उत्सवाचा इव्हें'ट झाला आणि महिनामहिना आधी मध्यरात्रीपर्यंत सराव रंगू लागले. तर बक्षिसांनी हंडीची उंची वाढवली नवनव्या पध्दती या थरांची ऊंची गाठायला रुजु लागल्या. आणि हंडी गगनाला गवसणी घालू लागली. त्याबरोबर मंडळ ही चपळता,शिस्त आणि कौशल्यालाच बलस्थान बनवून मंडळांनी आपल्या गोविंदा पथकंाना कॉर्पोरेट स्वरुप दिले.आता रंगीत तालमींनाही जोर चढू लागला आहे.अनेक संस्था,राजकीय पक्ष दहीहंडीच्या दिवशी असणार्‍या आयोजनाबरोबरच दहा -बारा दिवस आधी होणार्‍या रंगीत तालमींचेही आयोजन करु लागले. ह्या तालमीमुळे प्रत्येक गोविंदा पथकाला गोपाळकाल्याआधी आपल्या तयारीचा अंदाज येतो.त्यामुळे अनेक गोविंदा पथके ह्यात सामील होऊ लागली.सणाच्या भावनेचं महत्त्व कमी झालं. आणि दिखावू नखर्‍यांनाच भाव आला, अशी खंत काही जुनी मंडळी व्यक्त करतात. पण पाश्चिमात्य सण सहजतेनं साकारत असताना, आपलेही उत्सव ग्लोबल होऊन ग्लॅमरस झाले, तर त्यात वावगं काय, असा तरुण पिढीचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 26, 2010 02:08 PM IST

गोविंदांना प्रतीक्षा दहीहंडीची

26 ऑगस्ट

दहीहंडी आता जवळ आलीये आणि गोविंदा पथकांचे सरावही सुरु झाले आहेत. नाक्यावर दुमदुमणारी गोविंदाची अस्सल पारंपारिक गाणी. गोविंदा रे गोपाळाच्या आरोळीने दणाणून निघालेला परिसर. हंडी फोडण्यासाठी बाळगोपाळांचा दोन-चार मजल्यांचा थर आणि आपल्याच नाक्यावर बांधलेली हंडी फोडून बेधुंद होऊन नाचणारे बाळ गोपाळ.हे चित्र होत 6 ते7 वर्षापूर्वीच्या मुंबईतल्या बहुतेक नाक्यावरचं...

जमाना बदलला, उत्सवाचा इव्हें'ट झाला आणि महिनामहिना आधी मध्यरात्रीपर्यंत सराव रंगू लागले. तर बक्षिसांनी हंडीची उंची वाढवली नवनव्या पध्दती या थरांची ऊंची गाठायला रुजु लागल्या. आणि हंडी गगनाला गवसणी घालू लागली. त्याबरोबर मंडळ ही चपळता,शिस्त आणि कौशल्यालाच बलस्थान बनवून मंडळांनी आपल्या गोविंदा पथकंाना कॉर्पोरेट स्वरुप दिले.

आता रंगीत तालमींनाही जोर चढू लागला आहे.अनेक संस्था,राजकीय पक्ष दहीहंडीच्या दिवशी असणार्‍या आयोजनाबरोबरच दहा -बारा दिवस आधी होणार्‍या रंगीत तालमींचेही आयोजन करु लागले. ह्या तालमीमुळे प्रत्येक गोविंदा पथकाला गोपाळकाल्याआधी आपल्या तयारीचा अंदाज येतो.त्यामुळे अनेक गोविंदा पथके ह्यात सामील होऊ लागली.

सणाच्या भावनेचं महत्त्व कमी झालं. आणि दिखावू नखर्‍यांनाच भाव आला, अशी खंत काही जुनी मंडळी व्यक्त करतात. पण पाश्चिमात्य सण सहजतेनं साकारत असताना, आपलेही उत्सव ग्लोबल होऊन ग्लॅमरस झाले, तर त्यात वावगं काय, असा तरुण पिढीचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2010 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close