S M L

मुरबाडमधील दरोड्यात दोघांचा मृत्यू

27 ऑगस्टठाणे जिल्ह्यातील मुरबाडपासून तीन किलोमीटरवरील भुवन गावात काल रात्री एक दरोडा पडला. या दरोड्यात एका घरातील आजी आणि नातवाचा मुत्यू झाला. याच दरोडेखोरांच्या विरोधात आज मुरबाडकरांनी मुरबाड बंद केले आहे. तसेच मुरबाड - कल्याण - नगर हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गावकर्‍यांनी एक दरोडेखोर पकडलादरोडेखोरांपैकी एकाला गावकर्‍यांनी पकडून बेदम चोप दिला. आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरोडेखोरांनी वापरलेल्या क्वालिस गाडीची संतापलेल्या गावकर्‍यांनी तोडफोड केली. यावेळी आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे गाडीच्या नंबरप्लेटवर शिवसेनेचे चिन्ह होते. पण त्यानंतर चलाखीने कोणीतरी हे चिन्ह खरवडून टाकले. त्यामुळे हे नक्की काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न गावकर्‍यांना पडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 11:24 AM IST

मुरबाडमधील दरोड्यात दोघांचा मृत्यू

27 ऑगस्ट

ठाणे जिल्ह्यातील मुरबाडपासून तीन किलोमीटरवरील भुवन गावात काल रात्री एक दरोडा पडला. या दरोड्यात एका घरातील आजी आणि नातवाचा मुत्यू झाला. याच दरोडेखोरांच्या विरोधात आज मुरबाडकरांनी मुरबाड बंद केले आहे. तसेच मुरबाड - कल्याण - नगर हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गावकर्‍यांनी एक दरोडेखोर पकडला

दरोडेखोरांपैकी एकाला गावकर्‍यांनी पकडून बेदम चोप दिला. आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरोडेखोरांनी वापरलेल्या क्वालिस गाडीची संतापलेल्या गावकर्‍यांनी तोडफोड केली. यावेळी आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे गाडीच्या नंबरप्लेटवर शिवसेनेचे चिन्ह होते.

पण त्यानंतर चलाखीने कोणीतरी हे चिन्ह खरवडून टाकले. त्यामुळे हे नक्की काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न गावकर्‍यांना पडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close