S M L

देव आनंद यांना भेटण्याआधी नर्व्हस होतो - शंकर महादेवन

24ऑक्टोबर, मुंबईएव्हरग्रीन हिरो देव आनंद यांच्या आगामी ' चार्जशीट ' या सिनेमात आशा भोसलेंनी गाणं गायल्यानंतर आता शंकर महादेवनचा आवाजही या सिनेमातल्या एका सुफी स्टाईलच्या गाण्यात ऐकायला मिळणार आहे. देव आनंद यांचा चित्रपट निमिर्तीबाबतचा या वयातील उत्साह नवल करण्यासारखा आहे. त्यांचा आगामी सिनेमा ' चार्जशीट ' बद्दल ते कमालीचे उत्सुक आहेत. या सिनेमाचं संगीत हे रुटीन ट्रॅकपेक्षा थोडं वेगळं असणार आहे. गायिका आशा भोसलेंनी या सिनेमासाठी तब्बल 28 वर्षांनी देव आनंद यांच्यासाठी गाणं गायलं आहे आणि त्याच सिनेमाच्या दुसर्‍या गाण्याचंनुकतंच शंकर महादेवन यांच्या आवाजात ' पर्पल हेज ' या स्टुडिओत झालं. हे सुफी स्टाईलचं मस्त गाणं असलं तरी त्याला कव्वालीचा पण टच आहे. आणि या प्रोजेक्टचा भाग झाल्याचा मला आनंद आहेया गाण्याच्या निमित्तानं शंकर महादेवन आणि देव आनंद यांची भेट झाली. देव आनंद यांच्या भेटीबाबत शंकर महादेवन म्हणाले, मी त्यांना भेटण्याआधी खूप नर्व्हस होतो पण एकदा भेटल्यानंतर आम्ही एकमेकांना मिठी मारली '. युकेच्या राजा कनीफ या संगीतकाराने या सुफी गाण्याला संगीत दिलं आहे आणि हे गाणं नक्की हिट होणार, असं निर्मात्यांचं मत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2008 04:47 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2008 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close