S M L

नटरंग सिनेमाचा गौरव

27 ऑगस्टआत्तापर्यंत अनेक मराठी सिनेमांना आणि त्यांच्या संगीताला गौरवणारे पुरस्कार सोहळे पार पडले. पण पहिल्यांदाच मराठी संगीत आणि त्यासाठी काम करणारे तंत्रज्ञ यांचा मुंबईत सन्मान करण्यात आला. बीग मराठी सन्मान, असे या पुरस्कार सोहळ्याचे नाव आहे. या सोहळ्यासाठी रिलायन्स बीग एफएम यांनी ही संध्या आयोजित केली होती. या वर्षातील मराठी गीतांचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यामध्ये बाजी मारली, ती नटरंग या सिनेमाने. या सिनेमाचे संगीतकार अजय-अतुल यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून तर सर्वोत्कृष्ट गायक म्हणून अजय गोगावले यांचा सन्मान करण्यात आला. तसेच 'वाजले की बारा' या गाण्यासाठी बेला शेंडे हिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा सन्मान मिळाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 12:53 PM IST

नटरंग सिनेमाचा गौरव

27 ऑगस्ट

आत्तापर्यंत अनेक मराठी सिनेमांना आणि त्यांच्या संगीताला गौरवणारे पुरस्कार सोहळे पार पडले. पण पहिल्यांदाच मराठी संगीत आणि त्यासाठी काम करणारे तंत्रज्ञ यांचा मुंबईत सन्मान करण्यात आला. बीग मराठी सन्मान, असे या पुरस्कार सोहळ्याचे नाव आहे. या सोहळ्यासाठी रिलायन्स बीग एफएम यांनी ही संध्या आयोजित केली होती. या वर्षातील मराठी गीतांचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यामध्ये बाजी मारली, ती नटरंग या सिनेमाने. या सिनेमाचे संगीतकार अजय-अतुल यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून तर सर्वोत्कृष्ट गायक म्हणून अजय गोगावले यांचा सन्मान करण्यात आला. तसेच 'वाजले की बारा' या गाण्यासाठी बेला शेंडे हिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा सन्मान मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close