S M L

रोझरी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी

अद्वैत मेहता, पुणे 27 ऑगस्टपुण्यातील रोझरी इन्स्टि्यूटने गेली 10 वर्षे धर्मादाय आयुक्तांकडे ऑडीट रिपोर्ट्स सादर न केल्याने रोझरीची मान्यता रद्द करावी, अशी मागणी पालक संघटनेने केली आहे. तसेच मायनॉरिटी इन्स्टिट्यूटच्या नावाखाली रोजरी एकीकडे सरकारी अनुदान लाटत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना फीमधे सवलती देत नसल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.पुण्यातील रोजरी शाळा गेले अनेक दिवस चर्चेत आहे. फीवाढी विरोधात रोजरीच्या पालकांची एकजूट... शांततामय मार्गानं आंदोलने... सगळीकडे चर्चेचा विषय आहे. पण मुजोर मॅनेजमेंट बधायला तयार नाही. सध्या फीवाढीचा मुद्दा हायकोर्टात गेल्याने निकाल लागेपर्यंत फीवाढ करू नये, असा समझोता शाळा मॅनेजमेंट आणि पालक संघटनेत झाला. पण अचानक शाळेने आधी स्कॉलरशीप तर नंतर सबसिडीचे आमिष दाखवत वाढीव फी भरण्यासाठी पत्रे पाठवायला सुरुवात केली आहे.दुसरीकडे माहितीच्या अधिकारांतर्गत रोझरीने 2001 नंतर ऑडीट रिपोर्ट धर्मादाय आयुक्तांकडे सादर न केल्याचे पालक संघटनेने उघड केले आहे.रोझरी इन्स्टिट्यूटच्या एकूण 5 शाळा असून 14 हजार विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक किंवा मॅनेजमेंटने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. फी वाढीच्या मुद्यावरून रोझरीविरूध्दचा पालकांचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे.30 ऑगस्टला फी वाढी संदर्भात हायकोर्टाचा निकाल अपेक्षित असून सगळ्यांचेच या निकालाकडे लक्ष लागले आहे.याचसोबत अचानक रोजरी मॅनेजमेंटने विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप तसेच सबसिडीचे आमिष दाखवायला सुरवात करून पालकांमधे फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 04:32 PM IST

रोझरी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी

अद्वैत मेहता, पुणे

27 ऑगस्ट

पुण्यातील रोझरी इन्स्टि्यूटने गेली 10 वर्षे धर्मादाय आयुक्तांकडे ऑडीट रिपोर्ट्स सादर न केल्याने रोझरीची मान्यता रद्द करावी, अशी मागणी पालक संघटनेने केली आहे. तसेच मायनॉरिटी इन्स्टिट्यूटच्या नावाखाली रोजरी एकीकडे सरकारी अनुदान लाटत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना फीमधे सवलती देत नसल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.

पुण्यातील रोजरी शाळा गेले अनेक दिवस चर्चेत आहे. फीवाढी विरोधात रोजरीच्या पालकांची एकजूट... शांततामय मार्गानं आंदोलने... सगळीकडे चर्चेचा विषय आहे. पण मुजोर मॅनेजमेंट बधायला तयार नाही. सध्या फीवाढीचा मुद्दा हायकोर्टात गेल्याने निकाल लागेपर्यंत फीवाढ करू नये, असा समझोता शाळा मॅनेजमेंट आणि पालक संघटनेत झाला. पण अचानक शाळेने आधी स्कॉलरशीप तर नंतर सबसिडीचे आमिष दाखवत वाढीव फी भरण्यासाठी पत्रे पाठवायला सुरुवात केली आहे.

दुसरीकडे माहितीच्या अधिकारांतर्गत रोझरीने 2001 नंतर ऑडीट रिपोर्ट धर्मादाय आयुक्तांकडे सादर न केल्याचे पालक संघटनेने उघड केले आहे.रोझरी इन्स्टिट्यूटच्या एकूण 5 शाळा असून 14 हजार विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक किंवा मॅनेजमेंटने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. फी वाढीच्या मुद्यावरून रोझरीविरूध्दचा पालकांचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे.

30 ऑगस्टला फी वाढी संदर्भात हायकोर्टाचा निकाल अपेक्षित असून सगळ्यांचेच या निकालाकडे लक्ष लागले आहे.याचसोबत अचानक रोजरी मॅनेजमेंटने विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप तसेच सबसिडीचे आमिष दाखवायला सुरवात करून पालकांमधे फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close