S M L

'भगवा दहशतवाद' शब्दावरून संसदेत गदारोळ

आशिष दीक्षित, नवी दिल्ली27 ऑगस्ट'भगवा दहशतवाद' या शब्दावरून आज संसदेत जोरदार गदारोळ झाला. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी वापरलेल्या या शब्दांना भाजप आणि शिवसेनेने जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर काँग्रेसनेही चिदंबरम यांच्यापासून अंतर राखले. आणि दहशतवादाला रंग नसतो, असे म्हणत स्वतःच्या पक्षांच्या गृहमंत्र्यांना एकाकी पाडले.भगव्या दहशतवादापासून सावधन राहा, या चिदंबरम यांनी पोलीस अधिकार्‍यांना केलेल्या आवाहनावर भाजप आणि शिवसेनेने जोरदार आक्षेप घेतला. या दोन्ही पक्षांनी संसदेत या मुद्द्यावरून गदारोळ केला.शिवसेनेने दिल्लीबरोबरच मुंबईतही हा मुद्दा लावून धरला. चिदंबरम यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.चिदंबरम यांच्यावर चौफेर टीक ा झाल्यानंतर काँग्रेसने सावध भूमिका घेतली. दहशतवादाला रंग नसतो, असे म्हणत त्यांनी चिदंबरम यांच्यापासून अंतर राखले.2006 मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना अटक झाल्यानंतर सीबीआयने भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग केला होता. या स्फोटात अल्पसंख्यांक समाजातील 7 जणांचा बळी गेला होता. त्यापुढे जेव्हा जेव्हा मुस्लिमबहुल भागांत स्फोट झाले, तेव्हा तेव्हा त्यामागे कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचे धागेदोरे असल्याचे तपास यंत्रणांचे मत आहे. (फेब्रुवारी 2007 साली झालेला) समझौता एक्सप्रेसवरचा हल्ला असो की (मे 2007) हैदराबादेतल्या मक्का मशिदीतला बाँबस्फोट की (ऑक्टोबर 2007) अजमेर शरीफ वरचा बाँब हल्ला.. प्रत्येक वेळी भगवा दहशतवाद असा शब्दप्रयोग कधी तपास यंत्रणांकडून, कधी राजकाण्यांकडून तर कधी मीडियाकडून वापरला गेला.हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध समाजांमध्ये भगवा रंगाकडे त्यागाचं प्रतीक पाहिले जाते. राष्ट्रध्वजातील भगवा रंग हा स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाचे प्रतीक आहे. आणि आता याच भगव्या रंगावरून राजकारण होताना दिसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 04:46 PM IST

'भगवा दहशतवाद' शब्दावरून संसदेत गदारोळ

आशिष दीक्षित, नवी दिल्ली

27 ऑगस्ट

'भगवा दहशतवाद' या शब्दावरून आज संसदेत जोरदार गदारोळ झाला. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी वापरलेल्या या शब्दांना भाजप आणि शिवसेनेने जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर काँग्रेसनेही चिदंबरम यांच्यापासून अंतर राखले. आणि दहशतवादाला रंग नसतो, असे म्हणत स्वतःच्या पक्षांच्या गृहमंत्र्यांना एकाकी पाडले.

भगव्या दहशतवादापासून सावधन राहा, या चिदंबरम यांनी पोलीस अधिकार्‍यांना केलेल्या आवाहनावर भाजप आणि शिवसेनेने जोरदार आक्षेप घेतला. या दोन्ही पक्षांनी संसदेत या मुद्द्यावरून गदारोळ केला.शिवसेनेने दिल्लीबरोबरच मुंबईतही हा मुद्दा लावून धरला. चिदंबरम यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

चिदंबरम यांच्यावर चौफेर टीक ा झाल्यानंतर काँग्रेसने सावध भूमिका घेतली. दहशतवादाला रंग नसतो, असे म्हणत त्यांनी चिदंबरम यांच्यापासून अंतर राखले.2006 मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना अटक झाल्यानंतर सीबीआयने भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग केला होता. या स्फोटात अल्पसंख्यांक समाजातील 7 जणांचा बळी गेला होता.

त्यापुढे जेव्हा जेव्हा मुस्लिमबहुल भागांत स्फोट झाले, तेव्हा तेव्हा त्यामागे कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचे धागेदोरे असल्याचे तपास यंत्रणांचे मत आहे. (फेब्रुवारी 2007 साली झालेला) समझौता एक्सप्रेसवरचा हल्ला असो की (मे 2007) हैदराबादेतल्या मक्का मशिदीतला बाँबस्फोट की (ऑक्टोबर 2007) अजमेर शरीफ वरचा बाँब हल्ला.. प्रत्येक वेळी भगवा दहशतवाद असा शब्दप्रयोग कधी तपास यंत्रणांकडून, कधी राजकाण्यांकडून तर कधी मीडियाकडून वापरला गेला.

हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध समाजांमध्ये भगवा रंगाकडे त्यागाचं प्रतीक पाहिले जाते. राष्ट्रध्वजातील भगवा रंग हा स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाचे प्रतीक आहे. आणि आता याच भगव्या रंगावरून राजकारण होताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close