S M L

इमर्जन्सी लँडिंगप्रकरणी पायलटवर बंदी

28 ऑगस्ट जेट एअरवेजच्या इमर्जन्सी लँडिंग करणार्‍या पायलट आणि को पायलटवर विमान चालवायला बंदी घालण्यात आली आहे. तर, केबिन क्रूलासुद्धा उड्डाण करायला बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री जेटच्या 2302 मुंबई-चेन्नई विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. विमानाच्या डाव्या बाजूला धूर दिसल्याने पायलटने विमानाचे इमर्जन्सी लँडींग केले होते. त्यानंतर केबिन क्रूने दोन्ही बाजूचे दरवाजे उघडले. प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाल्यानंतरही, केबिन क्रूने आवश्यक ती काळजी घेतली नाही, असेही डीजीसीएने म्हटले आहे. त्यामुळे विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि शिडी जोडण्यापूर्वीच अनेक प्रवाशांनी विमानातून उड्या मारल्या. यात 50 प्रवासी जखमी झाले. तर त्यापैकी 17 प्रवासी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी 10 जणांना निलंबीत करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 11:18 AM IST

इमर्जन्सी लँडिंगप्रकरणी पायलटवर बंदी

28 ऑगस्ट

जेट एअरवेजच्या इमर्जन्सी लँडिंग करणार्‍या पायलट आणि को पायलटवर विमान चालवायला बंदी घालण्यात आली आहे. तर, केबिन क्रूलासुद्धा उड्डाण करायला बंदी घालण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री जेटच्या 2302 मुंबई-चेन्नई विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. विमानाच्या डाव्या बाजूला धूर दिसल्याने पायलटने विमानाचे इमर्जन्सी लँडींग केले होते. त्यानंतर केबिन क्रूने दोन्ही बाजूचे दरवाजे उघडले.

प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाल्यानंतरही, केबिन क्रूने आवश्यक ती काळजी घेतली नाही, असेही डीजीसीएने म्हटले आहे. त्यामुळे विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि शिडी जोडण्यापूर्वीच अनेक प्रवाशांनी विमानातून उड्या मारल्या.

यात 50 प्रवासी जखमी झाले. तर त्यापैकी 17 प्रवासी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी 10 जणांना निलंबीत करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close