S M L

पीएच.डी.वरून टोपे अडचणीत

28 ऑगस्टमहाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी मुंबई विद्यापीठात शुक्रवारी पीएच.डी.साठी मुलाखत दिली. टोपेंनी इंजीनिअरिंगची डिग्री घेतली आहे. आणि त्यांनी कॉमर्स विषयात पीएच.डी.साठी अर्ज केला आहे. पण त्यांची कुठलीही लेखी परीक्षा झाली नाही. राजेश टोपे यांच्या मुलाखतीसाठी तत्काळ आर. आर. कमिटीची म्हणजे रिसर्च रेकग्नायझेशन कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. वास्तविक आर. आर. कमिटीचे अध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरु असतात. पण मुंबई विद्यापीठाला सध्या प्रकुलगुरुच नाहीत. त्याहूनही धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातील आठही विद्यापीठांनी यूजीसीच्या गाईडलाईन्सनुसार पीएच.डी. प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा सुरू केली.मात्र मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलने मान्यता देऊनही विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेश परीक्षेचा नियम लागू केला नाही. त्यामुळे 30ऑगस्टला विद्यापीठाची होणारी सिनेटची सभा वादग्रस्त होणार आहे. 31 ऑगस्टला विद्यमान सिनेटची मुदत संपत आहे. त्यानंतर अस्तित्वात येणार्‍या पुढच्या सिनेटनंतर पीएच.डी. प्रवेशाचे नियम बदलणार आहेत. त्यापूर्वीच राजेश टोपेंनी पीएच.डी.साठी घाईघाईत अर्ज केल्यामुळे सिनेट सदस्यांनी आक्षेप घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 11:34 AM IST

पीएच.डी.वरून टोपे अडचणीत

28 ऑगस्ट

महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी मुंबई विद्यापीठात शुक्रवारी पीएच.डी.साठी मुलाखत दिली. टोपेंनी इंजीनिअरिंगची डिग्री घेतली आहे. आणि त्यांनी कॉमर्स विषयात पीएच.डी.साठी अर्ज केला आहे. पण त्यांची कुठलीही लेखी परीक्षा झाली नाही.

राजेश टोपे यांच्या मुलाखतीसाठी तत्काळ आर. आर. कमिटीची म्हणजे रिसर्च रेकग्नायझेशन कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. वास्तविक आर. आर. कमिटीचे अध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरु असतात. पण मुंबई विद्यापीठाला सध्या प्रकुलगुरुच नाहीत. त्याहूनही धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातील आठही विद्यापीठांनी यूजीसीच्या गाईडलाईन्सनुसार पीएच.डी. प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा सुरू केली.

मात्र मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलने मान्यता देऊनही विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेश परीक्षेचा नियम लागू केला नाही. त्यामुळे 30ऑगस्टला विद्यापीठाची होणारी सिनेटची सभा वादग्रस्त होणार आहे.

31 ऑगस्टला विद्यमान सिनेटची मुदत संपत आहे. त्यानंतर अस्तित्वात येणार्‍या पुढच्या सिनेटनंतर पीएच.डी. प्रवेशाचे नियम बदलणार आहेत. त्यापूर्वीच राजेश टोपेंनी पीएच.डी.साठी घाईघाईत अर्ज केल्यामुळे सिनेट सदस्यांनी आक्षेप घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close