S M L

विद्यार्थ्यांकडून बसेसची तोडफोड

28 ऑगस्टखासगी बस वेळेवर न आल्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दोन बसेसची तोडफोड केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यातील पहूर गावात घडला. त्यामुळे गावात सध्या तणावाचे वातावरण आहे. पहूर गावातील जवळपास 400 विद्यार्थी शिक्षणासाठी शेंदूर्णी गावातील कॉलेजात जातात. एसटी महामंडळाच्या बस नसल्याने ते या खाजगी बस सेवेचा उपयोग करतात. पण या मुलांकडून नियमीत पास काढणार्‍या दुर्गा ट्रॅव्हल्सची सेवाही कधीच वेळेवर मिळत नसल्याचा संताप या मुलांमध्ये होता. आज तब्बल 45 मिनीटे या दोन्ही बस उशीरा आल्याने विद्यार्थी संतापले. आणि त्यांनी ही तोडफोड केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 11:59 AM IST

विद्यार्थ्यांकडून बसेसची तोडफोड

28 ऑगस्ट

खासगी बस वेळेवर न आल्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दोन बसेसची तोडफोड केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यातील पहूर गावात घडला. त्यामुळे गावात सध्या तणावाचे वातावरण आहे. पहूर गावातील जवळपास 400 विद्यार्थी शिक्षणासाठी शेंदूर्णी गावातील कॉलेजात जातात.

एसटी महामंडळाच्या बस नसल्याने ते या खाजगी बस सेवेचा उपयोग करतात. पण या मुलांकडून नियमीत पास काढणार्‍या दुर्गा ट्रॅव्हल्सची सेवाही कधीच वेळेवर मिळत नसल्याचा संताप या मुलांमध्ये होता. आज तब्बल 45 मिनीटे या दोन्ही बस उशीरा आल्याने विद्यार्थी संतापले. आणि त्यांनी ही तोडफोड केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close