S M L

हॉस्पिटलच्या विरोधात धुळ्यात सेनेचे आंदोलन

28 ऑगस्टधुळे जिल्हा सरकारी हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभाराविरोधात शिवसेनेने शुक्रवारपासून आंदोलन सुरू केले. हॉस्पिटलमध्ये शामराव कौतिक पाटील या न्यूमोनियाच्या पेशंटला दाखल करण्यात आले. पण योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा हॉस्पिटलच्या आवारातच मृत्यू झाला, असा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी शामरावचा मृतेदह उचलून थेट अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांच्या टेबलावर नेऊन ठेवला. या घटनेमुळे हॉस्पिटलच्या आवारात तणाव निर्माण झाला. सेना कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा बघून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून डॉक्टरांनी पोलिसांना कळवले.त्यानंतर डॉ. गुप्ता यांना पोलीस संरक्षणात हॉस्पिटलबाहेर नेण्यात आले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 12:02 PM IST

हॉस्पिटलच्या विरोधात धुळ्यात सेनेचे आंदोलन

28 ऑगस्ट

धुळे जिल्हा सरकारी हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभाराविरोधात शिवसेनेने शुक्रवारपासून आंदोलन सुरू केले. हॉस्पिटलमध्ये शामराव कौतिक पाटील या न्यूमोनियाच्या पेशंटला दाखल करण्यात आले. पण योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा हॉस्पिटलच्या आवारातच मृत्यू झाला, असा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला.

त्यांनी शामरावचा मृतेदह उचलून थेट अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांच्या टेबलावर नेऊन ठेवला. या घटनेमुळे हॉस्पिटलच्या आवारात तणाव निर्माण झाला. सेना कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा बघून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून डॉक्टरांनी पोलिसांना कळवले.

त्यानंतर डॉ. गुप्ता यांना पोलीस संरक्षणात हॉस्पिटलबाहेर नेण्यात आले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close