S M L

लंकेवरची स्वारी अपयशी

28 ऑगस्टट्राय सीरिजच्या फायनलमध्ये यजमान श्रीलंकेनं भारताचा 74 रन्सनं पराभव करत मायक्रोमॅक्स कपवर आपलं नाव कोरल आहे. या विजयाबरोबरच लंकेनं एशिया कप मधल्या पराभवाचा वचपाही काढला. पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेनं भारतासमोर विजयासाठी 300 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पण भारताची इनिंग 225 रन्सवर ऑलआऊट झाली. महेंद्रसिंग धोणीनं एकाकी झुंज देत कॅप्टन इनिंग केली. पण तो टीमचा पराभव मात्र वाचवू शकला नाही. धोणीनं 67 रन्स केले. श्रीलंकेच्या भेदक बॉलिंगसमोर भारताची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा फ्लॉप ठरली. वीरेंद्र सेहवाग आणि दिनेश कार्तिकनं भारताच्या इनिंगची सुरुवात करत कार्तिकनं शुन्यवर बाद होत निराशा केली. सेहवागनं काही खणखणीत फोर मारले खरे पण 28 रन्सवर असताना तोही रनआऊट झाला. यानंतर युवराज सिंग आणि कोहलीनं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण तेही मोठी खेळी करु शकले नाहीत. युवराज 26 तर कोहली 37 रन्सवर आऊट झाले. पहिली बॅटिंग करणार्‍या लंकेनं 8 विकेट गमावत 299 रन्स केले. ओपनिंगला आलेल्या तिलकरत्ने दिलशाननं 110 रन्सची तुफान खेळी केली.दिलशाननं अवघ्या 115 बॉलमध्ये 12 फोर आणि 1 सिक्स मारतला. तर कॅप्टन कुमार संगकारानं 71 रन्स केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 05:56 PM IST

लंकेवरची स्वारी अपयशी

28 ऑगस्ट

ट्राय सीरिजच्या फायनलमध्ये यजमान श्रीलंकेनं भारताचा 74 रन्सनं पराभव करत मायक्रोमॅक्स कपवर आपलं नाव कोरल आहे. या विजयाबरोबरच लंकेनं एशिया कप मधल्या पराभवाचा वचपाही काढला.

पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेनं भारतासमोर विजयासाठी 300 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पण भारताची इनिंग 225 रन्सवर ऑलआऊट झाली.

महेंद्रसिंग धोणीनं एकाकी झुंज देत कॅप्टन इनिंग केली. पण तो टीमचा पराभव मात्र वाचवू शकला नाही. धोणीनं 67 रन्स केले. श्रीलंकेच्या भेदक बॉलिंगसमोर भारताची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा फ्लॉप ठरली. वीरेंद्र सेहवाग आणि दिनेश कार्तिकनं भारताच्या इनिंगची सुरुवात करत कार्तिकनं शुन्यवर बाद होत निराशा केली.

सेहवागनं काही खणखणीत फोर मारले खरे पण 28 रन्सवर असताना तोही रनआऊट झाला. यानंतर युवराज सिंग आणि कोहलीनं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण तेही मोठी खेळी करु शकले नाहीत.

युवराज 26 तर कोहली 37 रन्सवर आऊट झाले. पहिली बॅटिंग करणार्‍या लंकेनं 8 विकेट गमावत 299 रन्स केले. ओपनिंगला आलेल्या तिलकरत्ने दिलशाननं 110 रन्सची तुफान खेळी केली.

दिलशाननं अवघ्या 115 बॉलमध्ये 12 फोर आणि 1 सिक्स मारतला. तर कॅप्टन कुमार संगकारानं 71 रन्स केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close