S M L

तोडफोड विरोधात चाळीसगावात हॉस्पिटल्स बंद

29 ऑगस्टदेवरे हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी चाळीसगावातील डॉक्टर्सनी सर्व खाजगी हॉस्पिटल आणि दवाखाने तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही पेशंटवर उपचार करण्यासाठी शहरातील एकही डॉक्टर तयार नसल्याने उपचाराअभावी दोन पेशंटचा मृत्यू झाला आहे. शहरातील डॉ. जयंत देवरे यांच्या हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रीक शॉक लागलेल्या सुनील गवळी नावाच्या तरुणाला त्याच्या नातेवाईकांनी उपाचारासाठी आणले होते. पण दवाखान्यात येण्याआधीच तो मृत झाल्याचे डॉ. देवरे यांनी सांगितले.सुनीलसोबत असलेल्या अनेकांचा संताप उफाळून आला. आणि त्यांनी दवाखान्याची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणार्‍या स्टाफलाही त्यांनी मारहाण केली. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या इतर पेशंटलाही मारहाण झाली. या घटनेने व्यथित झालेल्या डॉ. जयंत देवरे यांनी आपले हॉस्पिटलच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2010 09:52 AM IST

तोडफोड विरोधात चाळीसगावात हॉस्पिटल्स बंद

29 ऑगस्ट

देवरे हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी चाळीसगावातील डॉक्टर्सनी सर्व खाजगी हॉस्पिटल आणि दवाखाने तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्याही पेशंटवर उपचार करण्यासाठी शहरातील एकही डॉक्टर तयार नसल्याने उपचाराअभावी दोन पेशंटचा मृत्यू झाला आहे.

शहरातील डॉ. जयंत देवरे यांच्या हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रीक शॉक लागलेल्या सुनील गवळी नावाच्या तरुणाला त्याच्या नातेवाईकांनी उपाचारासाठी आणले होते. पण दवाखान्यात येण्याआधीच तो मृत झाल्याचे डॉ. देवरे यांनी सांगितले.

सुनीलसोबत असलेल्या अनेकांचा संताप उफाळून आला. आणि त्यांनी दवाखान्याची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणार्‍या स्टाफलाही त्यांनी मारहाण केली.

हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या इतर पेशंटलाही मारहाण झाली. या घटनेने व्यथित झालेल्या डॉ. जयंत देवरे यांनी आपले हॉस्पिटलच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2010 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close