S M L

पाकिस्तानी क्रिकेट मॅच फिक्सींगच्या जाळ्यात

29 ऑगस्टपाकिस्तानी क्रिकेट प्लेअर्स पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगमध्ये सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानी बॉलर्स मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसिफसह कॅप्टन सलमान बट्ट आणि कामरान अकमल हे संशयाच्या जाळ्यात आहेत. ब्रिटिश पोलिसांनी या संदर्भात एका मॅच फिक्सरला अटकही केली आहे. सध्या पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज सुरू आहे. फिक्सिंग संदर्भात एका ब्रिटिश टॅब्लॉईड वृत्तपत्राने स्टिंग ऑपरेशन केले. त्यानुसार मझहर मजीद या व्यक्तीने 2 पाकिस्तानी बॉलर्सना लॉर्डस्‌वरच्या टेस्टमध्ये सातत्याने नो बॉल टाकावेत, यासाठी मॅनेज केल्याचा आरोप होत आहे. ठरल्याप्रमाणे आमीर आणि मोहम्मद आसिफ यांनी नो बॉल्स टाकलेही. त्याचप्रमाणे पाकचा कॅप्टन सलमान बट्ट आणि कामरान अकमल हे दोघेही मॅचफिक्सिंगमध्ये सामील असल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.पाकिस्तानचे टीम मॅनेजर यावर सईद यांनीही स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी टीममधील काही खेळाडूंची चौकशी केल्याची कबुली दिली आहे. पाक क्रिकेटर पोलिसांना आवश्यक ते सहकार्य करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2010 10:01 AM IST

पाकिस्तानी क्रिकेट मॅच फिक्सींगच्या जाळ्यात

29 ऑगस्ट

पाकिस्तानी क्रिकेट प्लेअर्स पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगमध्ये सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाकिस्तानी बॉलर्स मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसिफसह कॅप्टन सलमान बट्ट आणि कामरान अकमल हे संशयाच्या जाळ्यात आहेत. ब्रिटिश पोलिसांनी या संदर्भात एका मॅच फिक्सरला अटकही केली आहे.

सध्या पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज सुरू आहे. फिक्सिंग संदर्भात एका ब्रिटिश टॅब्लॉईड वृत्तपत्राने स्टिंग ऑपरेशन केले. त्यानुसार मझहर मजीद या व्यक्तीने 2 पाकिस्तानी बॉलर्सना लॉर्डस्‌वरच्या टेस्टमध्ये सातत्याने नो बॉल टाकावेत, यासाठी मॅनेज केल्याचा आरोप होत आहे. ठरल्याप्रमाणे आमीर आणि मोहम्मद आसिफ यांनी नो बॉल्स टाकलेही.

त्याचप्रमाणे पाकचा कॅप्टन सलमान बट्ट आणि कामरान अकमल हे दोघेही मॅचफिक्सिंगमध्ये सामील असल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

पाकिस्तानचे टीम मॅनेजर यावर सईद यांनीही स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी टीममधील काही खेळाडूंची चौकशी केल्याची कबुली दिली आहे. पाक क्रिकेटर पोलिसांना आवश्यक ते सहकार्य करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2010 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close