S M L

कोल्हापुरात आठवडाभर पाणीकपात

29 ऑगस्टकोल्हापूरमधील शिंगणापूर जलवाहिनी नव्याने जोडणी सुरू आहे. त्यामुळे येत्या मंगळवारपासून निम्म्या शहराला 8 दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. कळंबा फिल्टर हाऊस ते सायबर चौकापर्यंत 4 किलोमीटर अंतराची जलवाहिनी नव्याने टाकण्यात आली आहे. तसेच शेंडा पार्क, राजेंद्रनगर आणि राजारामपुरी इथेही नवीन जलवाहिनी जोडली जाणार आहे. जुन्या जलवाहिनीला 4 ठिकाणी नवे जोड देण्यात येणार आहेत. त्यामुळे एकाचवेळी 4 कामे सुरु झाल्याने निम्या शहराला मंगळवारपासून 8 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात महापालिकेने शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2010 10:07 AM IST

कोल्हापुरात आठवडाभर पाणीकपात

29 ऑगस्ट

कोल्हापूरमधील शिंगणापूर जलवाहिनी नव्याने जोडणी सुरू आहे. त्यामुळे येत्या मंगळवारपासून निम्म्या शहराला 8 दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

कळंबा फिल्टर हाऊस ते सायबर चौकापर्यंत 4 किलोमीटर अंतराची जलवाहिनी नव्याने टाकण्यात आली आहे. तसेच शेंडा पार्क, राजेंद्रनगर आणि राजारामपुरी इथेही नवीन जलवाहिनी जोडली जाणार आहे.

जुन्या जलवाहिनीला 4 ठिकाणी नवे जोड देण्यात येणार आहेत. त्यामुळे एकाचवेळी 4 कामे सुरु झाल्याने निम्या शहराला मंगळवारपासून 8 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या काळात महापालिकेने शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2010 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close