S M L

मॅच फिक्सिंगची पवारांकडून गंभीर दखल

30 ऑगस्टपाकिस्तानी खेळाडूंच्या मॅच फिक्सिंगचे प्रकरण आता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या अधिकार्‍यांना लंडनला पाठवणार आहे. बुकी मजहर माजिदने आणखी काही आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये फिक्सिंग केल्याची शक्यता आहे. त्यामुळे 80 आंतरराष्ट्रीय मॅचची यावरून चौकशी होणार आहे. तर, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या पहिल्या टेस्टमध्ये फिक्सिंग केल्याची तसेच, ऑस्ट्रेलिया सीरिजमध्येही फिक्सिंग केले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कोणत्याही आरोपांशिवाय माजिदची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी काल रात्री 7 पाकिस्तानी खेळाडूंची चौकशी केली. त्याचबरोबर पाक टीमचा कॅप्टन सलमान बट्ट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमेर यांचे मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर पाकिस्तानच्या फिक्सिंग प्रकरणी आयसीसी कठोर कारवाई करेल, अशी ग्वाही आयसीसी अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. आरोप सिद्ध झाले तर कुणावरही दयामाया दाखवण्यात येणार नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले आहे. माजी गर्लफ्रेंडचा खुलासामोहमद आसिफची माजी गर्लफ्रेंड वीणा मलिकने आसिफ हा मोठा मॅच फिक्सर असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर यात अनेक पाकिस्तानी प्लेअर्ससोबत धीरज दीक्षितही असल्याचे तिने सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2010 09:39 AM IST

मॅच फिक्सिंगची पवारांकडून गंभीर दखल

30 ऑगस्ट

पाकिस्तानी खेळाडूंच्या मॅच फिक्सिंगचे प्रकरण आता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या अधिकार्‍यांना लंडनला पाठवणार आहे. बुकी मजहर माजिदने आणखी काही आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये फिक्सिंग केल्याची शक्यता आहे.

त्यामुळे 80 आंतरराष्ट्रीय मॅचची यावरून चौकशी होणार आहे. तर, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या पहिल्या टेस्टमध्ये फिक्सिंग केल्याची तसेच, ऑस्ट्रेलिया सीरिजमध्येही फिक्सिंग केले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, कोणत्याही आरोपांशिवाय माजिदची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी काल रात्री 7 पाकिस्तानी खेळाडूंची चौकशी केली. त्याचबरोबर पाक टीमचा कॅप्टन सलमान बट्ट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमेर यांचे मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

तर पाकिस्तानच्या फिक्सिंग प्रकरणी आयसीसी कठोर कारवाई करेल, अशी ग्वाही आयसीसी अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. आरोप सिद्ध झाले तर कुणावरही दयामाया दाखवण्यात येणार नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.

माजी गर्लफ्रेंडचा खुलासा

मोहमद आसिफची माजी गर्लफ्रेंड वीणा मलिकने आसिफ हा मोठा मॅच फिक्सर असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर यात अनेक पाकिस्तानी प्लेअर्ससोबत धीरज दीक्षितही असल्याचे तिने सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2010 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close