S M L

मनसेच्या आंदोलनामुळे उत्तर भारतातले मराठी भीतीच्या छायेत

25 ऑक्टोबर, नवी दिल्ली - राज ठाकरे यांनी मुंबईतल्या उत्तर भारतीयांविरूद्ध युद्ध पुकारलं आणि काही तासांतच दिल्ली आणि पाटणा या शहरांच्या रस्त्यांवर तीव्र आंदोलनं झाली. या सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्राबाहेर विशेष करून उत्तर भारतात राहणारा मराठी माणूस थोडा भांबावला आहे. आता आपल्यावर तर हल्ले होणार नाहीत याची चिंता दिल्ली, पटणामध्ये राहणा-या मराठी नागरिकांना लागली आहे. दिल्लीत राहणारे सुधीर खांडेकर महाराष्ट्राबाहेर आणि उत्तर भारतात राहणा-या मराठी माणसांच्या व्यथेचं प्रतिनिधित्त्व करतात. 30 वर्षांपूर्वी सुधीर खांडेकर दिल्लीत आले. दिल्ली त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे, पण तो व्यवसाय करत असताना ‘आपण इथले मूळ निवासी नाही, बाहेरचे आहोत,’ असं त्यांना कधीच वाटलं नाही. उलट महाराष्ट्रात राहात नसल्याने आपण महाराष्ट्रीय नाही तर अनिवासी महाराष्ट्रीय आहोत, असं ते प्रांजळपणे सांगतात. आयटी, इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रांच्या निमित्ताने आजही शेकडो महाराष्ट्रीय तरूण वेगवेगळ्या राज्यात जात आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर नोकरी-धंद्यासाठी दिल्लीत आलेल्या महाराष्ट्रीयांची संख्या तब्बल 3 लाखावर आहे.. पण मनसेच्या आंदोलनामुळे काही एनआरएम म्हणजे अनिवासी महाराष्ट्रीयन मंडळी जरा चिंतेत पडली आहेत. राज यांच्या उत्तर भारतीयांविरूद्धच्या आंदोलनाबाबत या अनिवासी महाराष्ट्रीयन मंडळींच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. काहींना राज यांच्या आंदोलनामुळे असुरक्षितता वाटत आहे. तर कधीतरी या आंदोलनाचं लोण आपल्याकडे येऊ शकतं अशी भीती वाटत आहे. तर काहींना भीती नाही वाटत पण राज योग्य आहेत, असं वाटत आहे. ‘ हिंसा नाही केली तर सगळे मराठी लोक पाठिंबा देतील आणि परप्रांतातल्या मराठी माणसाला पण त्रास होणार नाही,’ असं मत सुधीर खांडेकर यांनी व्यक्त केलं आहे. न्यूटनचा सिद्धांत सांगतो की.. प्रत्येक कृतीला तेवढ्याच क्षमतेची प्रतिक्रिया मिळते. कदाचित या त्रिकालाबाधित सत्यातच NRMsच्या चिंतेचं मूळ आहे हे स्पष्ट होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2008 04:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2008 04:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close