S M L

खडसेंचा पवारांवर पलटवार

30 ऑगस्ट शरद पवार विरुद्ध एकनाथ खडसे हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.शरद पवारांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. 'आयबीएन-लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.शनिवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांनी विरोधी पक्षांवर 'तोडपाणी' करत असल्याचे आरोप केले होत. त्यामुळे भडकलेल्या खडसेंनी पवारांनीही सत्तेसाठी सोनिया गांधींशी 'तोडपाणी' केल्याचा आरोप केला. खडसे एवढ्यावरच थांबले नाहीत तर, सर्वाधिक भ्रष्टाचार हा राष्ट्रवादीच्या खात्यांमध्ये होतो, असा आरोपही त्यांनी केला. पवारांनी बिल्डरांचे वकीलपत्र घेतल्याचा आरोप त्यांनी केला. लवासा आणि इतर प्रकरणे लावून धरल्यानेच पवारांचे मन दुखावल्याची टीका खडसे यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2010 11:14 AM IST

खडसेंचा पवारांवर पलटवार

30 ऑगस्ट

शरद पवार विरुद्ध एकनाथ खडसे हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

शरद पवारांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. 'आयबीएन-लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

शनिवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांनी विरोधी पक्षांवर 'तोडपाणी' करत असल्याचे आरोप केले होत. त्यामुळे भडकलेल्या खडसेंनी पवारांनीही सत्तेसाठी सोनिया गांधींशी 'तोडपाणी' केल्याचा आरोप केला.

खडसे एवढ्यावरच थांबले नाहीत तर, सर्वाधिक भ्रष्टाचार हा राष्ट्रवादीच्या खात्यांमध्ये होतो, असा आरोपही त्यांनी केला.

पवारांनी बिल्डरांचे वकीलपत्र घेतल्याचा आरोप त्यांनी केला. लवासा आणि इतर प्रकरणे लावून धरल्यानेच पवारांचे मन दुखावल्याची टीका खडसे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2010 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close