S M L

पिंपरीतील 'सायन्स सेंटर' वादात

गोविंद वाकडे, पुणे30 ऑगस्टपिंपरी चिंचवड महापालिकेत 300 कोटी रुपये खर्च करुन ''सायन्स सेंटर'' नावाचा महत्वांकाक्षी प्रकल्प राबवला जात आहे. पण या प्रकल्पामध्ये अनेक बदल करण्यात आल्याची माहिती उघड झाल्यामुळे या प्रकल्पातील वाद आता समोर आले आहेतया प्रकल्पात विज्ञान, उर्जा आणि ऑटोमोबाईलच्या इतिहासाबद्दल माहिती देणारी दालने असणार आहेत. या प्रकल्पाचा प्रत्यक्ष खर्च 300 कोटींच्या घरात आहे. केंद्रानेही 9 कोटींची आर्थिक मदत दिली आहे. परंतू हा प्रकल्प दिशाभूल करणारा असल्याचा आरोप प्रकल्प समितीच्या अध्यक्षांनी केला आहे. जगातील सर्वात मोठे सायन्स सेंटर इथे उभारले जाताना त्यांची ऍनिमेटेड डॉक्युमेन्ट्रीही तयार करण्यात आली. मात्र दोन वर्षांनंतर त्यात आता अनेक बदल सुचवण्यात आले आहेत. या सर्व वादाबद्दल आयुक्तांना विचारणा केली असता त्यांनी सगळे काही नियमानुसार चालत असल्याचे सांगितले. दीड लाखात घर, दुमजली उड्डाण पूल, सिटी सेन्टर आणि आता सायन्स सेन्टर ... पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सायन्स सेंटरच्या निमित्ताने पुन्हा एकदा वादात सापडले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2010 01:31 PM IST

पिंपरीतील 'सायन्स सेंटर' वादात

गोविंद वाकडे, पुणे

30 ऑगस्ट

पिंपरी चिंचवड महापालिकेत 300 कोटी रुपये खर्च करुन ''सायन्स सेंटर'' नावाचा महत्वांकाक्षी प्रकल्प राबवला जात आहे. पण या प्रकल्पामध्ये अनेक बदल करण्यात आल्याची माहिती उघड झाल्यामुळे या प्रकल्पातील वाद आता समोर आले आहेत

या प्रकल्पात विज्ञान, उर्जा आणि ऑटोमोबाईलच्या इतिहासाबद्दल माहिती देणारी दालने असणार आहेत. या प्रकल्पाचा प्रत्यक्ष खर्च 300 कोटींच्या घरात आहे. केंद्रानेही 9 कोटींची आर्थिक मदत दिली आहे.

परंतू हा प्रकल्प दिशाभूल करणारा असल्याचा आरोप प्रकल्प समितीच्या अध्यक्षांनी केला आहे. जगातील सर्वात मोठे सायन्स सेंटर इथे उभारले जाताना त्यांची ऍनिमेटेड डॉक्युमेन्ट्रीही तयार करण्यात आली.

मात्र दोन वर्षांनंतर त्यात आता अनेक बदल सुचवण्यात आले आहेत. या सर्व वादाबद्दल आयुक्तांना विचारणा केली असता त्यांनी सगळे काही नियमानुसार चालत असल्याचे सांगितले.

दीड लाखात घर, दुमजली उड्डाण पूल, सिटी सेन्टर आणि आता सायन्स सेन्टर ... पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सायन्स सेंटरच्या निमित्ताने पुन्हा एकदा वादात सापडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2010 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close