S M L

मुंबईत शिवरायांचा पुतळा उपेक्षित

31 ऑगस्टशिवाजी महाराजांचे नाव घेऊन निवडणुकांमध्ये अनेकांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजल्यात... याच रयतेच्या राजाची, शिवरायांची उपेक्षा महाराष्ट्राच्या राजधानीत होत आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ असलेल्या आणि ऐतिहासिक वास्तूचा दर्जा लाभलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची दुरवस्था झाली आहे. आणि प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. हा पुतळा ज्या सदाशिव साठे यांनी तयार केलाय. आणि त्यांनीच या पुतळ्याची दुरवस्था आता उघड केली आहे.महापालिका प्रशासनाने या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी सदाशिव साठे यांना बोलवले तेव्हा ही बाब पुढे आली.या पुतळ्याच्या खालचा चौथरा कधीही कोसळेल अशा अवस्थेत आहे. तर शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यातल्या घोड्याच्या पोटालाही भेगा पडल्या आहेत. साठे यांनी पुतळाच्या चौथर्‍याच्या डागडुजीसाठी पालिका प्रशासन आणि महापौरांनाही संपर्क साधला पण सगळ्यांनीच टोलवा-टोलवीची उत्तरे दिली.शिवरायाचे नाव घेणार्‍यांनाच आज त्यांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अरबी समुद्रात शिवाजी महारांजांच्या पुतळ्याची संकल्पना पुढे करणारे आत गेले कुठे? की निवडणुका संपल्यानंतर सगळ्यानांच या राजाचा विसर पडला की काय, हा खरा प्रश्न या पुतळ्याच्या दुरवस्थेच्या निमित्ताने पुढे येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2010 10:55 AM IST

मुंबईत शिवरायांचा पुतळा उपेक्षित

31 ऑगस्ट

शिवाजी महाराजांचे नाव घेऊन निवडणुकांमध्ये अनेकांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजल्यात... याच रयतेच्या राजाची, शिवरायांची उपेक्षा महाराष्ट्राच्या राजधानीत होत आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ असलेल्या आणि ऐतिहासिक वास्तूचा दर्जा लाभलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची दुरवस्था झाली आहे. आणि प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

हा पुतळा ज्या सदाशिव साठे यांनी तयार केलाय. आणि त्यांनीच या पुतळ्याची दुरवस्था आता उघड केली आहे.

महापालिका प्रशासनाने या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी सदाशिव साठे यांना बोलवले तेव्हा ही बाब पुढे आली.

या पुतळ्याच्या खालचा चौथरा कधीही कोसळेल अशा अवस्थेत आहे. तर शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यातल्या घोड्याच्या पोटालाही भेगा पडल्या आहेत. साठे यांनी पुतळाच्या चौथर्‍याच्या डागडुजीसाठी पालिका प्रशासन आणि महापौरांनाही संपर्क साधला पण सगळ्यांनीच टोलवा-टोलवीची उत्तरे दिली.

शिवरायाचे नाव घेणार्‍यांनाच आज त्यांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अरबी समुद्रात शिवाजी महारांजांच्या पुतळ्याची संकल्पना पुढे करणारे आत गेले कुठे? की निवडणुका संपल्यानंतर सगळ्यानांच या राजाचा विसर पडला की काय, हा खरा प्रश्न या पुतळ्याच्या दुरवस्थेच्या निमित्ताने पुढे येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2010 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close