S M L

गोवा किनारपट्टीवर डांबरगोळे कायम

31 ऑगस्टगोव्याच्या किनारपट्टीवर डांबर मिश्रीत तेलाचा तवंग अजूनही येत आहे. कोलवाड, वेलकाम, बेतालबादे या बीचेसवर मोठ्या प्रमाणात तेल पसरले आहे. किनारपट्टीच्या सफाईचे काम गोवा पर्यटन विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.मात्र साठलेल्या डांबराचे ढीग करून त्याच ठिकाणी फक्त छोट्याशा खड्‌ड्यात टाकले जात आहेत. गोवा प्रशासनाकडून हे तेल आणि डांबर नेमके कशामुळे येत आहे, याबाबत अद्यापही ठोस स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. काल या किनार्‍यावर डांबर गोळे आढळले होते. त्यानंतर किनार्‍यांवर काळपट थर जमा झाला आहे. दरम्यान समुद्र किनार्‍यावरील तेल तवंग धोकादायक नाही, असं स्पष्टीकरण गोवा समुद्रविज्ञान संस्थेनं दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2010 11:22 AM IST

गोवा किनारपट्टीवर डांबरगोळे कायम

31 ऑगस्ट

गोव्याच्या किनारपट्टीवर डांबर मिश्रीत तेलाचा तवंग अजूनही येत आहे.

कोलवाड, वेलकाम, बेतालबादे या बीचेसवर मोठ्या प्रमाणात तेल पसरले आहे. किनारपट्टीच्या सफाईचे काम गोवा पर्यटन विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.मात्र साठलेल्या डांबराचे ढीग करून त्याच ठिकाणी फक्त छोट्याशा खड्‌ड्यात टाकले जात आहेत.

गोवा प्रशासनाकडून हे तेल आणि डांबर नेमके कशामुळे येत आहे, याबाबत अद्यापही ठोस स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

काल या किनार्‍यावर डांबर गोळे आढळले होते. त्यानंतर किनार्‍यांवर काळपट थर जमा झाला आहे. दरम्यान समुद्र किनार्‍यावरील तेल तवंग धोकादायक नाही, असं स्पष्टीकरण गोवा समुद्रविज्ञान संस्थेनं दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2010 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close