S M L

नागपूर महानगरपालिकेत सांडपाण्यापासून वीज निर्मिती

25 ऑक्टोबर, नागपूर - 'टाकाऊपासून टिकाऊ' बनवण्याचा प्रयत्न अनेकजण आपापल्या परीनं करत असतात. नागपूरमध्ये असा एक वेगळा प्रयत्न केला आहे चक्क महानगरपालिकेनं. नेहमीच टीकेची धनी होणारी ही महापालिका सांडपाण्यापासून वीजनिमिर्ती करणार आहे. नागपूर शहराला दररोज 530 दशलक्ष लिटर्सचा पाणीपुरवठा होतो. त्यातून रोज तयार होतं, 380 दशलक्ष लिटर्स सांडपाणी. यापैकी 80 दशलक्ष लिटर्स पाण्यावर प्रक्रीया करून ते पाणी नाग नदीत सोडलं जातं. उरलेल्या सांडपाण्याचा सुदुपयोग करावा असा विचार महापालिकेनं केला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या या अभिनव उपक्रमाविषयी सत्ताधारी सत्ताधारी भाजप नेते अनिल सोले सांगतात, 'दिल्ली च्या रिठ्यामध्ये एक प्लाण्ट आहे ज्यात लोक पाणी शुध्द करून वीज निर्मिती करण्यासाठी विकतात. त्यामुळे मग आम्हीही कुणी पाणी विकत घेत कां हे शोधायला लागलो.आणि 'महाजनको'नं विकत घेतलं. आहे. 'महाजनको' म्हणजे 'महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी जनरेशन कंपनी'. महानगरपालिका 110 दसलक्ष लिटर्स पाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी 'महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी जनरेशन कंपनी'ला देणार आहे. यासाठी महापालिकेला भरावी लागणारी रक्कम कंपनीच भरणार आहे. 'महाजनको'च्या अभिनव उपक्रमाविषयी 'महाजनको'चे प्रबंध संचालक अजय मेहता म्हणाले, 'हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे की सांडपाण्यापासून वीज निर्मिती करणार आहे. आमच्याकडे जमीन होती पण पाणी नव्हतं. ते आता आम्हाला ते मिळणार आहे. त्यामुळे 2 हजार मेगॉवॅट वीज निर्मितीचा प्लाट तयार होणार आहे.'याच सांडपाण्यवर प्रक्रिया करून महानगरपालिकेला दरवर्षी 15 कोटी याप्रमाणे 30 वर्षाच्या करारामध्ये 450 कोटी रुपये मिळणार आहे. वीजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. वीजनिर्मितीसाठी पाण्याचा नेहमीच तुटवडा जाणवतो. मात्र या प्रोजेक्टमधून ही उणीव दूर करणं शक्य होणार आहे. कोराडी इथे या पाण्यावर वीजनिर्मिती करण्यासाठी 660 मेगॉवॅटचे 3 प्लॅण्ट तयार करण्यात येणार आहेत. हे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी जवळपास 3 वर्षं लागतील. या अभिनव प्रकल्पामुळे भविष्यात वीज टंचाई कमी व्हायला मदत होईल अशी आशा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2008 08:47 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2008 08:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close