S M L

अमिताभला चिंता मेट्रोची

31 ऑगस्टबिग बी अमिताभ बच्चन यांनी मेट्रो रेल्वे प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मेट्रो रेल्वेचा मार्ग हा अमिताभ यांच्या जूहू येथील प्रतिक्षा बंगल्यावरुन जाणार आहे. त्यामुळेच अमिताभ चिंतेत पडले आहेत. आपल्या ब्लॉगमध्ये त्यांनी ही चिंता मांडली आहे. एका बाजूला या प्रकल्पामुळे नोकरदार वर्गाला तसेच सर्वसामान्य मुंबईकरांना याचा फायदा होणार असल्याचे अमितजींनी सांगितले. पण दुसरीकडे हा मार्ग प्रतिक्षावरुन जात असल्याने लवकरच आपली प्रायव्हसी नाहीशी होणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. शिवाय या प्रकल्पाचे अधिकारी नुकतेच प्रतिक्षा बंगल्यावर येऊन संबंधित पाहणी करुन गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.आबांचा सल्लादरम्यान स्वत:पुरता विचार न करता इतरांची सोय होणार असेल तर असा त्याग करावाच लागतो, या शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अमिताभ यांना सल्ला दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2010 02:59 PM IST

अमिताभला चिंता मेट्रोची

31 ऑगस्ट

बिग बी अमिताभ बच्चन यांनी मेट्रो रेल्वे प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मेट्रो रेल्वेचा मार्ग हा अमिताभ यांच्या जूहू येथील प्रतिक्षा बंगल्यावरुन जाणार आहे. त्यामुळेच अमिताभ चिंतेत पडले आहेत.

आपल्या ब्लॉगमध्ये त्यांनी ही चिंता मांडली आहे. एका बाजूला या प्रकल्पामुळे नोकरदार वर्गाला तसेच सर्वसामान्य मुंबईकरांना याचा फायदा होणार असल्याचे अमितजींनी सांगितले. पण दुसरीकडे हा मार्ग प्रतिक्षावरुन जात असल्याने लवकरच आपली प्रायव्हसी नाहीशी होणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवाय या प्रकल्पाचे अधिकारी नुकतेच प्रतिक्षा बंगल्यावर येऊन संबंधित पाहणी करुन गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आबांचा सल्ला

दरम्यान स्वत:पुरता विचार न करता इतरांची सोय होणार असेल तर असा त्याग करावाच लागतो, या शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अमिताभ यांना सल्ला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2010 02:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close