S M L

मरीन ड्राईव्हवर अपघातात एक ठार

1 सप्टेंबरमरिन ड्राईव्हवर रात्री झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. तर एक जण जखमी झाला आहे. सुशील कोठारी असे गाडी चालवणार्‍याचे नाव आहे. तो दारु पिऊन गाडी चालवत होता. सुशील हा कोठारी बिल्डर्सचा मुलगा असल्याचे समजते. त्याने पहिल्यांदा चर्चगेटजवळ उभ्या असलेल्या टॅक्सीला धडक मारली.पुढे मरीन ड्राईव्हला बाईकवर जाणार्‍या दोघांना उडवले. त्यात जमीर शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यानंतर पुढे सुशील कोठारीने आपल्या गाडीचा वेग कायम ठेवत मलबार हील रोडवर पार्क असलेल्या दोन गाड्यांना धडक दिली. पोलीस गाडीच्या मागावर होते. मलबार हीलला नाकाबंदी करण्यात आली होती. तिथेच त्याला पकडण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 1, 2010 11:15 AM IST

मरीन ड्राईव्हवर अपघातात एक ठार

1 सप्टेंबर

मरिन ड्राईव्हवर रात्री झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. तर एक जण जखमी झाला आहे.

सुशील कोठारी असे गाडी चालवणार्‍याचे नाव आहे. तो दारु पिऊन गाडी चालवत होता. सुशील हा कोठारी बिल्डर्सचा मुलगा असल्याचे समजते. त्याने पहिल्यांदा चर्चगेटजवळ उभ्या असलेल्या टॅक्सीला धडक मारली.

पुढे मरीन ड्राईव्हला बाईकवर जाणार्‍या दोघांना उडवले. त्यात जमीर शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यानंतर पुढे सुशील कोठारीने आपल्या गाडीचा वेग कायम ठेवत मलबार हील रोडवर पार्क असलेल्या दोन गाड्यांना धडक दिली.

पोलीस गाडीच्या मागावर होते. मलबार हीलला नाकाबंदी करण्यात आली होती. तिथेच त्याला पकडण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2010 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close