S M L

केरळी माणसाचं हत्तीप्रेम मल्याळी प्राईम टाइमध्ये

25 ऑक्टोबर, आयबीएनप-लोकमत ब्युरो - केरळच्या माणसांचं हत्तीप्रेम सर्वश्रुत आहे. केरळच्या अशाच एका मानाच्या हत्तीची जीवन कहाणी एका मालिकेद्वारे प्राईम टाईम मध्ये दाखवण्यात येत आहे. या मालिकेत दोन वर्षांचा माधवन नावाचा हत्ती काम करत आहे. आणि अनेक मल्ल्याळी प्रेक्षकांना ती टीव्हीसमोर खिळवून ठेवत आहे. दोन वर्षांचा माधवन केरळच्या सुप्रसिध्द गुरुवायुर मंदिरातील गुरुवायुर केशवन हत्तीची भुमिका साकारत आहे. हा युवा नायक माधवन शुटिंगच्यावेळी खूप त्रास देत होता. इतका की, माहुत तेथे नसता तर त्यांच्या युनिटला काम करणं खुप कठीण झालं असतं.'माधवन हत्ती पहिल्यांदाच कॅमे-यासमोर येत आहे. तो खूप खट्याळ असल्यामुळे त्याच्याकडून कॅमे-यासमोर काम करून घेणं आव्हानात्मक आहे,'असं माहुत प्रकाशन यांनी सांगितलं. पण या सगळ्यांच्या कष्टाचं फळ लगेचच मिळालं आहे. प्राईमटाइममध्ये दाखल झालेली ही मालिका सुपरहिट ठरली आहे. बेबी एलिफण्ट माधवनही खूप सुपरस्टार झाला आहे. इतका की, त्याच्याबरोबर काम करणा-या कृष्णापेक्षाही जास्त.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2008 10:36 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2008 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close