S M L

जागतिक मंदीचा फटका कापूस आणि सोयाबीनला

25 ऑक्टोबर, अकोला - जागतिक मंदीचा फटका महाराष्ट्रातल्या शेतक-यांनाही बसत आहे. सप्टेंबरमध्ये आलेल्या जागतिक मंदीमुळे सोयाबीनच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात 31 टक्क्यांनी खाली उतरल्या आहेत. कापसाच्याही किमतींमध्ये शेतक-यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. सरकारने कापसासाठी हमी किंमत जाहीर केलेली असली तरीही अनेक शेतकरी खुल्या बाजारात कापूस विकत आहेत. आणि त्यांना हा फटका सहन करावा लागत आहे. 'गेल्या वर्षी शेतक-यांना सोयाबीनसाठी क्विंटलमागे 2800 रुपये मिळाले होते. म्हणून आम्ही जास्तीत जास्त सोयाबीन पेरलं. एकट्या अकोल्यात 1 लाख 10 हजार इतक्या जमिनीवर सोयाबीनचा पेरा घेण्यात आला होता. पण उशिरा आलेल्या पावसामुळे आणि किडीमुळे सोयाबीनचं पीक वाया गेलं. इतकंच नव्हे तर सोयाबीनचं पीक बाजारात येईपर्यंत त्याच्या अपेक्षित किंमतीही घसरल्या होत्या...' अकोल्याचे शेतकरी अनुप काकड सांगत होते. 'मार्केटमध्ये भाव कमी यतोय. पण सणासुदीचे दिवस आहेत आणि कामगारांचंही देणं द्यायचं आहे. त्यामुळे मी आत्ताच विक्री करतोय,’ अशी माहिती अनुप काकड यांनी दिली. अनुप काकड अकोल्यातल्या शेतक-यांचं प्रातिनिधिक रूप आहे. या वर्षी जुलै महिन्यात सोयाबीनच्या प्रति क्विंटलची किंमत 2,800 रुपये होती. ऑगस्ट महिन्यात ती 2,700 झाली. सोयाबीनच्या प्रतिक्विंटलची किंमत सप्टेंबर महिन्यात 1,975 वर आली. आणि आता ऑक्टोबर महिन्यात ती 1,676 रुपयांवर आली आहे. सोयाबीनची घटनारी किंमत ही शेतक-यांना घोर लावून गेली आहे. त्यावर कृषी उतपन्न बाजार समितीचे अध्यक्ष शिषीर धोत्रे सांगतात, ‘सोयाबीनचा केक काढून त्याची म्हणजे ढेपेची विक्री होते. पण जागतिक मंदीमुळे या दोन्हीची किंमत उतरलेय. त्यामुळे सोयाबीनलाही किंमत मिळत नाही आहे.’ सोयाबीनप्रमाणे कापसाच्या उत्पदनावर जागतिकमंदीचा फटका बसला आहे. 'मीडियम कापसासाठी 2500 रुपये क्विंटल दर होता तो आता 2000 पर्यंत खाली आला आहे, असं कमोडिटी विश्लेषक बद्रुद्दीन खान यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात यंदा 300 लाख टन इतकं कापसाचं उत्पादन झालं आहे. पण त्याच्याही किंमतीमध्ये घट होते आहे. 'जागतिक मंदीचा हा परिणाम आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ही परिस्थिती आहे आणि पुढचे दोन महिने ती अशीच राहील,' असं कमोडिटी विश्लेषक वेदिका नार्वेकर यांचं म्हणणं आहे. आता मंदीमुळे किंमती घसरल्या तरीही मालाचा साठा करून ठेवणं शेतक-यांना परवडणारं नाही आहे. त्यामुळे मंदी उतरल्यानंतर भाव वधारले तरी शेतक-यांचं यावर्षीसाठी मात्र नुकसानच होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2008 10:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2008 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close