S M L

अमरनाथचा मुद्दा जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या केंद्रस्थानी

जम्मू-काश्मीर निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. काही दिवसांपूर्वी अमरनाथ मंदिर ट्रस्टला दिलेल्या जमिनीवरून राज्याचं राजकारण पेटलं होतं. आपापली वोट बँक मजबूत करण्यासाठी काही पक्षांनी याच मुद्याचा वापर करण्याचे डावपेच आखले आहेत. आम्ही अमरनाथ आंदोलनात सामील होतो. हा आमचा मुद्दा आहे. निवडणुकीत हा मुद्दा असणारच आहे , असं भाजपचे जम्मू-काश्मीर प्रभारी, आर. पी. सिंग याचं म्हणंण आहे. तर अमरनाथ वादामळे राज्यात जम्मू विरुद्ध काश्मीर असं ध्रुवीकरण झालं आहे. निवडणुकीच्या प्रचारात नॅशनल कॉन्फरन्स ही दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे , असं नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार, ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं. अमरनाथ संघर्ष समितीच्या नेत्यांनी 60 दिवस अमरनाथ आंदोलन धगधगतं ठेवलं होतं. समिती दावा करत आहे की त्याचं आंदोलन अराजकीय होतं. पण आता सर्वांना त्याचा विसर पडला आहे. संघटना जरी बिगरराजकीय असली तरी आमचं समर्थन करणा-या उमेदवाराला आम्ही पाठींबा देणार हे साहजिकच आहे, असं अमरनाथ संघर्ष समितीचे प्रवक्ते, डॉ. जितेंदर सिंग सांगतात अमरनाथचं वादळ शमलं असलं तरी निवडणुकीत हा मुद्दा केंद्रस्थानी येईल असं सद्या तरी चित्र दिसतंय

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2008 11:44 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2008 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close