S M L

गिरणी कामगारांच्या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध

3 सप्टेंबरअखेर हो नाही म्हणत राज्य सरकारने गिरणी कामगारांच्या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पण ही जाहिरात गिरणी कामगारांची माहिती गोळा करण्यासाठी करण्यात आली आहे. असा आरोप गिरणी कामगार संघर्ष समितीने केला आहे. म्हाडाच्या या जाहिरातीमध्ये चालू आणि बंद गिरण्यांमधील कामगारांनी 50 रुपये फी भरुन अर्ज भरावे, त्यानंतर पात्र कामगारांचे निकष आणि घराची किंमत कळणार आहे. त्यामुळे ही जाहिरात फसवी आहे, असा आरोप गिरणी कामगारांनी केला आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीनंतर जाहिरात काढायचे ठरले होते. पण म्हाडाने घाईघाईत ही संदिग्ध जाहिरात प्रसिद्ध केल्याचे गिरणी कामगारांचे म्हणणे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 12:28 PM IST

गिरणी कामगारांच्या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध

3 सप्टेंबर

अखेर हो नाही म्हणत राज्य सरकारने गिरणी कामगारांच्या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पण ही जाहिरात गिरणी कामगारांची माहिती गोळा करण्यासाठी करण्यात आली आहे. असा आरोप गिरणी कामगार संघर्ष समितीने केला आहे.

म्हाडाच्या या जाहिरातीमध्ये चालू आणि बंद गिरण्यांमधील कामगारांनी 50 रुपये फी भरुन अर्ज भरावे, त्यानंतर पात्र कामगारांचे निकष आणि घराची किंमत कळणार आहे. त्यामुळे ही जाहिरात फसवी आहे, असा आरोप गिरणी कामगारांनी केला आहे.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीनंतर जाहिरात काढायचे ठरले होते. पण म्हाडाने घाईघाईत ही संदिग्ध जाहिरात प्रसिद्ध केल्याचे गिरणी कामगारांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close